Join us
Daily Top 2Weekly Top 5

वयाच्या १७ व्या वर्षी प्रेग्नेंट होती ही अभिनेत्री, आता आहे बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2019 21:00 IST

बॉलिवूडच्या या अभिनेत्रीनं १६ व्या वर्षी तिच्यापेक्षा पंधरा वर्षे मोठ्या असणाऱ्या अभिनेत्यासोबत लग्न केलं होतं.

बॉलिवूडमधील पहिले सुपरस्टार राजेश खन्ना हे असे स्टार आहेत, ज्यांनी एका पाठोपाठ एक असे बरेच हिट चित्रपट दिले होते. त्यामुळेच बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार बनले होते. राजेश खन्ना त्यांच्या चित्रपटांमुळे जेवढं चर्चेत असत तितकेच त्यांच्या व डिम्पल कपाडिया यांच्या प्रेमाचीही खूप चर्चा झाली होती. ज्यावेळी डिंपल राजेश खन्ना यांच्यावर प्रेम करत होती त्यावेळी ती फक्त १६ वर्षांची होती आणि राजेश खन्ना ३१ वर्षांचे होते. त्यांच्यामध्ये १५ वर्षांचा फरक होता. 

डिंपल यांना भेटण्याआधी राजेश खन्ना अभिनेत्री व मॉडेल अंजू महेंद्रुसोबत लिव इन रिलेशनशीपमध्ये राहत होते. मात्र त्यांच्यातील मतभेदांमुळे ते वेगळे झाले. जेव्हा डिंपल बॉबी चित्रपटाचं शूटिंग करत होत्या, त्यावेळी राजेश खन्ना यांनी डिंपल यांना पाहिले.

जेव्हा त्यांना डिंपल यांच्या ब्रेकअपबद्दल समजलं त्यावेळी थोडाही वेळ वाया न घालवता त्यांना लग्नाची मागणी घातली.

आपल्या आवडत्या अभिनेत्यानं लग्नाची मागणी घातल्यावर डिंपल यांनी लगेचच होकार दिला होता.

वयाच्या १६ व्या वर्षी डिंपल यांनी राजेश खन्ना यांच्यासोबत लग्न केलं होतं. लग्नानंतर १९७३ साली डिंपल यांनी बॉबी चित्रपटातून पदार्पण केलं होतं. 

राजेश खन्ना व डिंपल कपाडिया या दोघांमध्ये १५ वर्षांचे अंतर होते. त्यांचं नातं जास्त काळ टिकू शकलं नाही. पण, त्यांनी घटस्फोटही घेतला नाही.

डिंपल व राजेश यांना दोन मुली आहेत त्या म्हणजे ट्विंकल व रिंकी खन्ना. 

टॅग्स :डिम्पल कपाडियाट्विंकल खन्नाराजेश खन्ना