Join us

अभिनेत्री डिंपल कपाडीयाच्या या फोटोला पाहून, नेटीझन्सने दिल्या अशा कमेंटस्

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2019 17:49 IST

या वयातही तिच्या या हटके लूकची चाहत्यांनाही चांगलीच भुरळ पडत असल्याचे पाहायला मिळते आहे.

आजही डिंपल कपाडीयाला पाहताच आजच्या तरुणींनाही लाजवेल असं तिचं सौंदर्य टिकून आहे. डिंपलचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोत तिने केसांना कलर केल्यामुळे  संपूर्ण लूकमध्ये बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. हा फोटो पाहून डिंपलने  अशा प्रकारचा हेअर कलर का केला असावा हा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही. एका फॉरेनर प्रमाणेच डिंपल या फोटोत भासत आहे.  डिंपल एका हॉलिवूड प्रोजेक्टमध्ये काम करत आहेत भूमिकेची गरज म्हणून तिने असा हेअर कलर करत अशा प्रकारचा बदल केला असावा असेही तर्कवितर्क लावले जात आहेत. तिचा हा फोटो पाहून चाहत्यांनी या फोटोवर खूप सारे लाईक्स आणि कमेंटस करत असल्याचे पाहायला मिळत आहे. नेहमीप्रमाणे आपली अदा, सौंदर्य, फॅशन, स्टाइल आणि चेहऱ्यावरील प्रचंड आत्मविश्वास तिच्या या फोटोमध्ये पाहायला मिळत आहे. डिंपल ही  वयाची 62  वर्षे ओलांडली असली तरी या वयातही तिच्या या हटके लूकची चाहत्यांनाही चांगलीच भुरळ पडत असल्याचे पाहायला मिळते आहे.

तसेच डिंपल तीन वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.  यापूर्वी २०१५ मध्ये ‘वेलकम बॅक’ या चित्रपटात ती दिसली होती. ‘ब्रह्मास्त्र’मध्ये डिंपल कुठली भूमिका साकारणार, याबद्दल अद्याप खुलासा झालेला नाही. नागार्जुन व ती एकत्र सीन्स देणार का, हेही अद्याप गुलदस्त्यात आहे. पण ही जोडी एकत्र आलीच तर नागार्जुन व डिंपल यांचा एकत्र केलेला हा पहिला सिनेमा असेल.

डिंपल कपाडिया ही बॉलिवूडची अशी एकुलती एक अभिनेत्री असेल जिने पहिला सिनेमा सुपरहिट झाल्यानंतरच अनेक वर्ष सिनेमांपासून दूर राहिली होती. डिंपलचा दुसरा सिनेमा तब्बल 12 वर्षांनी आला होता. कारण तिने लग्न केले होते.डिंपल ही बॉलिवूडमध्ये आपल्या बोल्ड अंदाजासाठीच ओळखली जात होती. 'बॉबी' या पहिल्याच सिनेमातच तिने अनेक बोल्ड सीन देऊन सर्वांना धक्का दिला होता. डिंपल कपाडियाने अभिनेता अनिल कपूर यांच्यासोबतही एक इंटीमेट सीन दिला होता. हा सीन बॉलिवूडच्या सर्वात इंटीमेट सीनपैकी एक मानला जातो. हा सीन तिने 'जाबांज' सिनेमात दिला होता. डिंपल कपाडिया आणि सनी देओल यांच्यातील अफेअरच्या चर्चाही त्यावेळी फार रंगल्या होत्या. असे सांगितले जाते की, दोघांचं अफेअर 11 वर्ष सुरु होतं. 

टॅग्स :डिम्पल कपाडिया