Join us

डिम्पल कपाडियाने एक क्षणही सोडला नाही सनी देओलचा हात, व्हिडीओमध्ये झाला उलगडा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2017 19:51 IST

सकाळीच सनी देओल आणि डिम्पल कपाडियाचा एक फोटो व्हायरल झाला होता. आता याच फोटोचा व्हिडीओ समोर आला असून, त्यामध्ये डिम्पल सनीचा एक क्षणही हात सोडत नसल्याचे दिसून येत आहे.

आज सकाळीच अभिनेता सनी देओल आणि डिम्पल कपाडियाचा एका फोटो सोशल मीडियावर वाºयासारखा व्हायरल झाला. फोटोमध्ये दोघेही लंडनमधील एका बस स्टॉपवर हातात हात घालून बसलेले दिसत आहेत. या फोटोवरून असेही म्हटले जात आहे की, डिम्पल आणि सनीने कित्येक वर्षांनंतर एकमेकांना टच केले. दोघांच्या या फोटोवरून त्यांच्या जुन्या अफेअरच्या चर्चा रंगू लागल्या असून, त्यांच्यातील नाते आजही घनिष्ठ आहे, हेही त्यानिमित्त अधोरेखित होत आहे. आता समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तर हे स्पष्ट होते की, दोघांमध्ये एकमेकांप्रती किती जिव्हाळा आहे. कारण व्हिडीओमध्ये डिम्पल सनीचा हात एक क्षणही सोडत नसल्याचे दिसत आहे. असे म्हटले जात आहे की, सनी आणि डिम्पलने हा फोटो आणि व्हिडीओ आॅगस्ट महिन्यात काढला असावा. कारण सनीने या फोटोचा उलगडा करण्यासाठी त्याच्या ट्विटर अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये सनीपाजी मनालीच्या निसर्गरम्य वातावरणात बघावयास मिळत आहे. सध्या सनी त्याच्या मुलाच्या ‘पल पल दिल के पास’ या डेब्यू चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असून, मी लंडनमध्ये नसून, मनालीत असल्याचा जणूकाही त्याने उलगडा केला आहे. मुंबई मिररच्या रिपोर्टनुसार, सनी देओल आणि त्याची एक्स गर्लफ्रेंड डिम्पल कपाडिया काही महिन्यांपूर्वीच लंडन येथे भेटले होते. या फोटोवरून एक गोष्ट स्पष्ट होते की, हे दोघे आजही एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. त्यामुळे दोघांचा हा फोटो जेव्हापासून व्हायरल झाला आहे, तेव्हापासून प्रत्येकजण त्याच्यावर चर्चा करताना दिसत आहे. आता तर या दोघांचा व्हिडीओ समोर आल्यामुळे सनी आणि डिम्पलमधील प्रेमाच्या चर्चा नव्याने रंगविल्या जात आहेत.