दिलवाला शाहरू ख 'चिपकू' - बोमन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 13:48 IST
शाहरूख खानला त्याच्या करियरमध्ये 'बादशाह' आणि 'किंग खान' या टॅगने ओळखले गेले आहे. परंतु, 'दिलवाले' मधील सहकलाकार बोमन ईरानी ...
दिलवाला शाहरू ख 'चिपकू' - बोमन
शाहरूख खानला त्याच्या करियरमध्ये 'बादशाह' आणि 'किंग खान' या टॅगने ओळखले गेले आहे. परंतु, 'दिलवाले' मधील सहकलाकार बोमन ईरानी यांनी शाहरूखला जो टॅग लावला आहे, तो कदाचित तुम्ही ऐकला नसेल. त्याने शाहरूखला जॅम म्हटले आहे. परंतु, बोमनने शाहरूखला जॅम का म्हटले? याचे स्पष्टीकरण देताना ते सांगतात की,' शाहरूख अगदी जॅमसारखाच आहे. खारट आणि चिपकू. तो खरंतर एक टीम प्लेयर आहे. तो ज्यावेळेस एखाद्या चित्रपटात काम करतो त्यावेळी सर्वांना त्याच्या स्वत:कडे आकर्षून घेतो. जसे ब्रेडच्या स्लाईसला जोडण्यासाठी जॅम आपण लावतो.' बोमन ईरानी यांनी शाहरूखसोबत अनेक चित्रपटात काम केले आहे. 'डॉन','हॅप्पी न्यू ईयर', 'दिलवाले' यामध्ये दोघांनी एकत्र काम केले आहे. ते म्हणाले,' शाहरूखसोबत माझे खुप चांगले जमते. मी त्याचा खुप आदर करतो. चित्रपटाचे यश तो सर्वांसोबत शेअर करतो, ही बाब मला त्याची खुपच आवडते.