Diljit Dosanjh : जगभरात आपल्या आवाजाची जादू पसरवणारा लोकप्रिय पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझ सध्या त्याच्या 'ऑरा वर्ल्ड टूर'मुळे चर्चेत आहे. मात्र, कॅनडातील एका कॉन्सर्टदरम्यान दिलजीतने मृत्यू आणि जीवनाबद्दल एक धक्कादायक विधान केले आहे. त्यामुळे त्याचे चाहते कमालीचे चिंतेत पडले. याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
कॅलगरी येथील स्कोटियाबँक सॅडलडोममध्ये कॉन्सर्ट करत असताना दिलजीत अचानक थांबला आणि प्रेक्षकांशी संवाद साधू लागला. त्याने पंजाबी भाषेत आपले आध्यात्मिक आणि वैयक्तिक विचार मांडले. दिलजीत म्हणाला, "मी हे जग आधीच सोडून गेलो आहे. मला मृत्यूची भीती वाटत नाही. गेल्या डिसेंबरमध्ये मी या शरीरातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होतो. पण आता, हे शरीर सोडण्यापूर्वी मला अजून काही कामे पूर्ण करायची आहेत. मी या मंचावर उभा आहे आणि हाच माझा देव आहे".
दिलजीतने पुढे प्रेम, क्षमा आणि पंजाबशी असलेल्या नात्यावर भर दिला. "माझे कोणाशीही वैर नाही, मी सर्वांवर प्रेम करतो. प्रेम, आदर आणि क्षमा या गोष्टी मी माझ्या आयुष्यात उतरवण्याचा प्रयत्न करत आहे" असेही तो म्हणाला. मात्र, दिलजीतच्या या विधानानंतर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. इंस्टाग्राम आणि रेडिटवर युझर्सनी दिलजीतच्या मानसिक आरोग्याबद्दल चिंता व्यक्त केली. काहींच्या मते, दिलजीत सततच्या ट्रोलिंगमुळे किंवा कोणत्यातरी मानसिक दबावाखाली असू शकतो. एका युझरने लिहिले की, "लोक या गोष्टीची चेष्टा करत आहेत हे पाहून वाईट वाटते, आपण मानसिक आरोग्याला गांभीर्याने घेतले पाहिजे".
Web Summary : Diljit Dosanjh's recent concert in Canada included a shocking statement about life and death, causing concern among fans. He expressed detachment from the world and mentioned past attempts to leave his body, sparking worry about his mental well-being.
Web Summary : कनाडा में दिलजीत दोसांझ के एक संगीत कार्यक्रम में जीवन और मृत्यु पर चौंकाने वाले बयान से प्रशंसक चिंतित हैं। उन्होंने दुनिया से अलगाव व्यक्त किया और शरीर छोड़ने के पिछले प्रयासों का उल्लेख किया, जिससे उनके मानसिक स्वास्थ्य के बारे में चिंता बढ़ गई।