Join us
Daily Top 2Weekly Top 5

दिलीप कुमार यांची बहीण सईदा खान यांचं निधन, दीर्घ आजारानंतर घेतला जगाचा निरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2023 09:10 IST

दिवंगत अभिनेते दिलीप कुमार यांची बहीण सईदा यांचं निधन झालं आहे.

दिवंगत अभिनेते दिलीप कुमार यांची बहीण सईदा यांचं निधन झालं आहे. सईदा यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नसल्याची माहिती जवळच्या नातेवाईकांनी दिली.  प्रसिद्ध चित्रपट निर्माते मेहबूब खान यांचा मुलगा इक्बाल खान यांच्या त्या पत्नी होत्या. इक्बाल खान यांचं पाच वर्षांपूर्वी निधन झालं. पतीच्या निधनानंतर सईदा यांची मुलगी इल्हाम आणि मुलगा साकिब काळजी घेत होते.

सईदा यांचा मुलगा साकिब  वडिलांप्रमाणेच एक फिल्ममेकर आहे. त्यांची मुलगी इल्हाम ही लेखिका आहे. सईदा यांच्या  निधनाने संपूर्ण कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दिलीप कुमार यांच्या पत्नी सायरा बानो यांनी अद्याप सईदा यांच्या निधनावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सईदा त्यांचा भाऊ दिलीप कुमार यांच्या खूप जवळ होत्या. त्या मोठ्या मनाच्या होत्या. सईदा शेवटच्या काही वर्षांपूर्वी त्यांच्या बहिणीचे पती शौकत खानसोबत मेहबूब स्टुडिओमध्ये दिसल्या होत्या. जिथे, दोघेही फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजला 10 लाख रुपयांचा धनादेश देताना दिसले. या कार्यक्रमात निर्माता-दिग्दर्शक साजिद नाडियादवाला देखील सहभागी झाले होते.

टॅग्स :दिलीप कुमार