Join us

चाहत्यांच्या संदेशांमुळे भावुक झाले दिलीपकुमार; पहा लेटेस्ट फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2017 14:30 IST

प्रकृती अस्वस्थामुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले दिग्गज अभिनेते दिलीपकुमार यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. काही तासांपूर्वीच त्यांचा एक ...

प्रकृती अस्वस्थामुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले दिग्गज अभिनेते दिलीपकुमार यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. काही तासांपूर्वीच त्यांचा एक फोटो ट्विटरवर शेअर करण्यात आला असून, त्यामध्ये त्यांची प्रकृती उत्तम दिसत आहे. दरम्यान, दिलीपकुमार यांच्या आजारपणात त्यांच्या चाहत्यांनी ट्विटरवर हजारोंच्या संख्येंनी संदेश पाठवित त्यांच्या उत्तम प्रकृतीसाठी प्रार्थना केली. चाहत्यांचे हे संदेश वाचून दिलीपकुमार चांगलेच भावुक झाल्याचे दिसून आले. यावेळी त्यांच्या डोळ्यात अश्रू आले होते. दिलीपकुमार यांचे मित्र तथा माउथशट डॉट कॉमचे संस्थापक व सीईओ फैजल फारूकी यांनी शुक्रवारी ट्विट करताना लिहिले की, ‘साहेबांच्या शेजारी बसून तुम्ही पाठविलेले शेकडो संदेश वाचले. जेव्हा मी संदेश वाचत होतो, तेव्हा त्यांच्या चेहºयावर समाधानाचे हास्य फुलले होते. तसेच डोळ्यात अश्रूही आले होते. फारूकी सध्या दिलीपकुमार यांचे अधिकृत ट्विटर अकाउंट हाताळत आहेत. त्यांच्या वतीने तेच चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी नेहमी मॅसेजेस करीत असतात. फारूकी यांनी आणखी एक ट्विट करताना त्यात लिहिले की, ‘साहेबांची तब्येत आता ठीक आहे. तुमचे सर्व संदेश ऐकून ते आनंदी झाले अन् त्यांच्या डोळ्यात अश्रूही आले.’ फारूकी दररोज दिलीपकुमार यांच्या प्रकृतीविषयीची माहिती ट्विटच्या माध्यमातून त्यांच्या चाहत्यांना कळवित असतात. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री प्रियंका चोपडा हिने दिलीपकुमार यांची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी प्रियंकासोबतचे काही फोटोज्देखील ट्विटरवर शेअर करण्यात आले.