Join us
Daily Top 2Weekly Top 5

दिलीप कुमार यांना रुग्णालयातून देण्यात आला डिस्चार्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2018 19:18 IST

गेल्या काही दिवसांपासून दिलीप कुमार न्यूमोनियाने त्रस्त असल्याने त्यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

ठळक मुद्देदिलीप कुमार यांना आराम करण्याचा दिला सल्ला

हिंदी चित्रपटसृष्टीमधील जेष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना आज लीलावती रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून दिलीप कुमार न्यूमोनियाने त्रस्त असल्याने त्यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दिलीप कुमार यांना रुग्णालयात दाखल केल्यापासूनच त्यांच्या प्रकृतीबाबत उलट सुलट चर्चा सुरु होत्या. मात्र त्यांना लिलावतीतून डिस्चार्ज मिळाला असून दिलीप कुमार यांची प्रकृती स्थिर असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दिलीप कुमार यांचे जवळचे समजले जाणारे फैसल फारुकी यांनी दिलीप कुमार यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंट द्वारे त्यांच्या डिस्चार्ज बाबत माहिती दिली आहे त्यांनी लिहिले की, देवाच्या कृपेने दिलीप साहेबांची प्रकृती आता ठीक असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. डॉक्टरांनी त्यांना सक्तीचा आराम घेण्याचा सल्ला दिला आहे.

 

दरम्यान दिलीप कुमार यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याचे वृत्त आल्याने त्यांच्या चाहत्यावर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे. 

टॅग्स :दिलीप कुमार