Join us

चिंताजनक! ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची प्रकृती बिघडली, रूग्णालयात भरती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2021 10:52 IST

Dilip Kumar Health Updates: बॉलिवूडचे ज्येष्ठ नेते दिलीप कुमार यांच्या प्रकृती संदर्भातली मोठी अपडेट समोर आली आहे.

ठळक मुद्देगेल्या महिन्यातही दिलीप कुमार यांना याच रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते दिलीप कुमार (Veteran actor Dilip Kumar) यांची प्रकृती अचानक बिघडली असून त्यांना मुंबईच्या हिंदुजा रूग्णालयात भरती करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांना श्वास घेण्यास त्रास जाणवत होता. यादरम्यान त्यांच्यावर घरीच उपचार सुरु होते. मात्र आज रविवारी सकाळी त्यांची प्रकृती अचानक खालावली आणि त्यांना तातडीने हिंदुजा रूग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले. (Dilip Kumar admitted to hinduja hospital)तूर्तास डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. दिलीप कुमार यांच्या पत्नी सायरा बानो यांच्या हवाल्याने एएनआयने याबाबतचे वृत्त दिले आहे.

गेल्या महिन्यातही दिलीप कुमार यांना याच रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. अर्थात रूटिन चेकअपसाठी दिलीप कुमार यांना भरती करण्यात आल्याचे सायरा बानो यांनी त्यावेळी स्पष्ट केले होते. लवकरच त्यांना डिस्चार्जही झाला होता. कोरोना संक्रमणामुळे गेल्या वर्षी दिलीप कुमार यांच्या दोन लहान भावांचे निधन झाले. गतवर्षी 21 ऑगस्टला त्यांचा लहान भाऊ असलम यांचे निधन झाले होते. ते 88 वर्षांचे होते. यानंतर 2 सप्टेंबरला आणखी एक भाऊ अहसान यांनी जगाचा निरोप घेतला होता. ते 90 वर्षांचे होते.दिलीप कुमार व सायरा बानो बॉलिवूडमधील एक आदर्श कपल म्हणून ओळखले जाते.  सायरा बानो सावलीसारख्या दिलीप कुमार यांच्यासोबत आहेत. त्यांची सेवा करत आहे.  ‘मैं उन्हे सच्चा प्यार करती हूं और वे मेरी जिंदगी है,’ असे सायरा बानो यावेळी यापूर्वी एका मुलाखतीत म्हणाल्या होत्या.   

टॅग्स :दिलीप कुमार