Join us

 काय म्हणता, सुशांतच्या ‘दिल बेचारा’चा टायटल ट्रॅक केवळ 11 लोकांनी पाहिला? युट्यूबवरील व्ह्युज कुठे झाले गायब?  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2020 16:01 IST

अचानक झालेल्या प्रकाराने गोंधळले सुशांतचे चाहते

ठळक मुद्दे  ‘दिल बेचारा’ या सिनेमातील टायटल ट्रॅकमध्ये सुशांत जबरदस्त डान्स करताना दिसतोय.

‘दिल बेचारा’ हा सुशांत सिंग राजपूतचा  अखेरचा सिनेमा. सुशांत आज जगात नाही. त्याच्या मृत्यूनंतर त्यांचा हा सिनेमा ओटीटीवर रिलीज होतोय. सुशांतचा हा सिनेमा पाहण्यास चाहते प्रचंड उत्सुक आहे. काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला तेव्हा या ट्रेलरला ‘रेकॉर्डब्रेक’ व्ह्युज मिळाले होते. आज या चित्रपटाचा टायटल ट्रॅक रिलीज झाला आणि या गाण्यावरही चाहत्यांच्या उड्या पडल्या. काहीच मिनिटांत युट्यूबवर या गाण्याला लाखो लाईक्स व व्ह्युज मिळालेत. पण हे काय? गाणे रिलीज होऊन तासभर होत नाही तोच हे सगळे व्ह्युज गायब झालेत आणि या गाण्याला केवळ 11 व्ह्युज दिसू लागले.

तासाभरापूर्वी 2.7 लाख व्ह्युज आणि तासाीरानंतर 11 व्ह्युज पाहून युजर्स गोंधळले. हा काय प्रकार आहे, असा प्रश्न अनेकांना पडला. काही तांत्रिक बिघाडामुळे असे झाल्याचा अंदाज यानंतर व्यक्त करण्यात आला. अर्थात अद्याप युट्यूब वा ‘दिल बेचारा’च्या मेकर्सकडून काहीही खुलासा करण्यात आलेला नाही.काही वेळाने गाण्याच्या व्ह्युज मात्र वाढला. बातमी लिहिलेपर्यंत हा व्हुयुजचा आकडा 44 लाखांवर पोहोचला होता.

  ‘दिल बेचारा’ या सिनेमातील टायटल ट्रॅकमध्ये सुशांत जबरदस्त डान्स करताना दिसतोय. या गाण्यात सुशांत अभिनेत्री संजना सांघीसोबत थिरकताना दिसतोय. दोघांची आॅनस्क्रिन केमिस्ट्रीही जबरदस्त आहे. प्रसिद्ध संगीतकार आणि गायक ए. आर रेहमान यांनी हे गाणे संगीतबद्ध केले असून त्यांनीच हे गाणे गायले आहे.  हा सिनेमा लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्म हॉटस्टार डिज्नीवर प्रदर्शित होतोय.

टॅग्स :सुशांत सिंग रजपूत