गौतम गुलाटी कोबरा चित्रपटासाठी डाएटवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2017 10:08 IST
गौतम गुलाटीने कहानी हमारे महाभारत की, कसम से, तुझ संग प्रीत लगायी सजना, दिया और बाती हम यांसारख्या मालिकांमध्ये ...
गौतम गुलाटी कोबरा चित्रपटासाठी डाएटवर
गौतम गुलाटीने कहानी हमारे महाभारत की, कसम से, तुझ संग प्रीत लगायी सजना, दिया और बाती हम यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. त्यानंतर तो बिग बॉस 8 मध्ये झळकला. या सिझनचा तो विजेता ठरला होता. त्याने मालिकांसोबतच चित्रपटातही काम केले आहे. अझर या चित्रपटात त्याने रवी शास्त्री यांची भूमिका पार पाडली होती. तो आता कोबरा या चित्रपटात झळकणार आहे. चित्रपटातील भूमिकेसाठी नेहमीच कलाकारांना खूप मेहनत घ्यावी लागते. कधी कित्येक किलो वजन वाढवावे लागते तर कधी कमी करावे लागते. गौतम गुलाटीदेखील त्याच्या कोबरा या आगामी चित्रपटासाठी खूप मेहनत घेत आहे. या चित्रपटासाठी सध्या तो स्ट्रीक्ट डाएट करत आहे. या चित्रपटात त्याचे शरीर पिळदार दिसणे गरजेचे आहे आणि त्याचसाठी तो सध्या डाएट करण्यासोबतच जीममध्ये घाम गाळत आहे. विशेष म्हणजे गौतमला बटर चिकन आणि दाल मखनी खूप आवडते. पण गेल्या काही दिवसांपासून त्याला त्याचे आवडते पदार्थदेखील खाता आलेले नाहीत. या सगळ्यामुळे माझे शरीर खिळखिळे झाले आहे असे मला वाटतेय असे तो सांगतो. गौतमने नुकतेच एक ट्वीट करून ही बातमी त्याच्या चाहत्यांना सांगितली आहे. त्याने ट्वीटमध्ये म्हटले आहे की, मला चीट मिल हवे आहे. तो पुढे म्हणतो, मला चॉकलेट अथवा चिट मिल द्या... माझे शरीर पिळदार दिसण्यासाठी मी गेल्या 35 दिवसांपासून डाएट करत आहे आणि अजून 30 दिवस तरी मला डाएट करावे लागणार आहे. मी सगळेच माझे आवडते पदार्थ मिस करत आहे.