Join us

​अक्षय कुमारचा त्याची मुलगी नितारासोबतचा हा क्युट व्हिडिओ तुम्ही पाहिला का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2017 14:44 IST

अक्षय कुमार त्याच्य कामात कितीही व्यग्र असला तरी तो त्याच्या कुटुंबियांना नेहमीच वेळ देतो. तो फॅमिली मॅन आहे असे ...

अक्षय कुमार त्याच्य कामात कितीही व्यग्र असला तरी तो त्याच्या कुटुंबियांना नेहमीच वेळ देतो. तो फॅमिली मॅन आहे असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. त्याची मुले तर त्याचा जीव की प्राण आहेत. तो वेळात वेळ काढून मुलांसोबत नेहमीच फिरायला जातो. त्यांच्यासोबत तो जास्तीत जास्त वेळ घालवतो. तो नेहमीच त्यांच्यासोबत मजा मस्ती करत असतो आणि त्यांच्या या मजा मस्तीचे फोटो देखील सोशल मीडियावर पोस्ट करत असतो. अक्षयने आरवचे अनेक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. पण तो निताराला नेहमीच मीडियापासून दूर ठेवतो. पण अक्षयने नुकताच त्याच्या मुलीसोबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला असून हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. निताराचा नुकताच पाचवा वाढदिवस झाला त्या वाढदिवसाच्या निमित्ताने अक्षयने त्याच्या मुलीसोबतचा हा व्हिडिओ काढला आहे. या व्हिडिओसोबत त्याने लिहिले आहे की, माझ्या संपूर्ण दिवसातील सगळ्यात चांगले काम हेच आहे. माझी मुलगी माझी शेव्हिंग करते. माझ्यासाठी हा अतिशय अनमोल ठेवा आहे. माझ्या प्रिन्सेसला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तिच्याकडे मी एकच विनंती करतोय की, तू कधीच मोठी होऊ नकोस.