Join us

ऋषी कपूरचा लहानपणीचा हा फोटो तुम्ही बघितला काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2017 16:25 IST

गेल्या काही दिवसांपासून ट्रोल प्रकरणामुळे गाजत असलेले अभिनेते ऋषी कपूर यांनी त्यांचा लहानपणीचा एक ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट फोटो नुकताच ...

गेल्या काही दिवसांपासून ट्रोल प्रकरणामुळे गाजत असलेले अभिनेते ऋषी कपूर यांनी त्यांचा लहानपणीचा एक ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट फोटो नुकताच त्यांच्या फॅन्सबरोबर शेअर केला आहे. या फोटोमध्ये ऋषी हातात बरेचसे कॉमिक्स घेऊन बघावयास मिळत असून, त्यांच्या हातात बॅकदेखील दिसत आहे. हा फोटो तेव्हाचा जेव्हा ऋषी फ्लाइट पकडण्यासाठी जात होते. ६४ वर्षीय ऋषी कपूरने ट्विटवर फोटो पोस्ट करताना लिहिले की, ‘बी.ओ.ए.सी. पहिले ब्रिटिश एअरवेज आणि बघा कोण फ्लाइट पकडण्यासाठी जात आहे. त्याच्या हातात असलेल्या कॉमिक्सला विसरू नका आणि पायातील पांढºयाशुभ्र मोजेही लक्षात ठेवा.’ फोटोमध्ये लहानपणीचा ऋषी खूपच गोंडस दिसत असून, डोळे मोठे करून बघत असताना दिसत आहे. नुकत्याच झालेल्या झी सिने अवॉर्डस्मध्ये ऋषी कपूर यांना बेस्ट सर्पोर्टिंग मेल आणि बेस्ट अ‍ॅक्टर इन कॉमिकसाठी पुरस्कार मिळाले आहेत. हे दोन्ही पुरस्कार त्यांना ‘कपूर अ‍ॅण्ड सन्स’ या सिनेमासाठी मिळाले आहेत. }}}} त्याचबरोबर ऋषी यांनी जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी हा फोटो शेअर केला आहे. वास्तविक ऋषी नेहमीच सोशल मीडियावर अशाप्रकारच्या पोस्ट शेअर करून चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वीच युजर्ससोबतचा त्यांचा वाद गाजला होता. त्यानंतर त्यांनी प्रोफाइल फोटो बदलून बंदूक हातात असलेला एक फोटो अपलोड केला. यावेळी त्यांनी युजर्सला ट्रोल न करण्याचा दम दिला होता. त्याचबरोबर ट्रोल करताना ‘शिव्या द्याल तर शिव्याच मिळतील’ असे वादग्रस्त वक्तव्यही त्यांनी केले होते. तसेच ट्रोल करणाºयांना ते थेट ब्लॉक करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.