वरूण धवनने खरेदी केलेले नवे घर तुम्ही पाहिलेत? नसेल तर पाहा हा खास व्हिडिओ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2017 12:00 IST
आत्तापर्यंत वरूणने ९ चित्रपट दिलेत आणि सगळेच हिट झालेत. आता तर वरूणने मुंबईत स्वत:चे अलिशान घरही खरेदी केले आहे.
वरूण धवनने खरेदी केलेले नवे घर तुम्ही पाहिलेत? नसेल तर पाहा हा खास व्हिडिओ!
बॉलिवूडच्या अनेक स्टार्ससाठी यंदाचे सरते वर्षे म्हणजेच २०१७ फार काही खास राहिले नाही. पण वरूण धवनचे विचाराल तर मात्र यंदाचे वर्षे अनेकार्थाने खास राहिले, असेच म्हणता येईल. होय, यावर्षी आलेले वरूणचे दोन्ही सिनेमे ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ आणि ‘जुडवा2’ बॉक्सआॅफिसवर हिट ठरलेत. वरूणने स्वत:ला सिद्ध करत, तो एक ‘लंबी रेस का घोडा’ आहे, हे सगळ्यांनाच दाखवून दिले. आत्तापर्यंत वरूणने ९ चित्रपट दिलेत आणि सगळेच हिट झालेत. आता तर वरूणने मुंबईत स्वत:चे अलिशान घरही खरेदी केले आहे. होय, वरूणची आई लाली धवन हिने डिझाईन केलेले हे घर अप्रतिम आहे, असेच म्हणावे लागले. काल वरूणच्या या घरात गृहप्रवेशाची पूजा झाली. वरूणचे अनेक मित्र,बॉलिवूडचे सेलिब्रिटी यावेळी हजर होते. वरूणची गर्लफ्रेन्ड नताशा ही सुद्धा यावेळी दिसली. अभिनेते अनुपम खेर यांनीही वरूणच्या हाऊसवॉर्मिंग पार्टीला हजेरी लावली. केवळ हजेरीच नाही तर त्यांनी वरूणच्या घराचा एक सुंदर व्हिडिओही चाहत्यांसोबत शेअर केला. या व्हिडिओत वरूण स्वत: आपले सुंदर सजवलेले घर दाखवतो आहे. ‘वरूणने मला त्याचे नवे घर दाखवले. वरूणचे पिता डेव्हिड धवन वेस्पा स्कुटर चालवायचे, अगदी तेव्हापासून मी त्याला ओळखतो आहे. कष्टाचे फळ. आई लाली धवन हिने हे घर सजवले आहे,’ असे अनुपम यांनी हा व्हिडिओ शेअर करताना लिहिले आहे. तेव्हा वरूणचे नवे घर तुम्हीही पाहा आणि ते कसे वाटले, ते आम्हाला नक्की कळवा.ALSO READ : करण जोहरने दिला सल्ला! वरूण धवनचे वाढले भाव!!वरूण धवन लवकरच शूजित सरकारच्या ‘अक्टूबर’ या चित्रपटात दिसणार आहे. नुकतेच वरूणने या चित्रपटाचे शूटींग संपवले.आधी हा चित्रपट रणबीर कपूरला आॅफर झाला होता. पण ऐनवेळी यात वरूणची वर्णी लागली. या चित्रपटाश्विाय शरत कटारिया यांच्या ‘सुई धागा’ या चित्रपटातही वरूण दिसणार आहे. यात तो अनुष्का शमार्सोबत आॅनस्क्रीन रोमान्स करताना दिसेल.