Join us

​ही करिना तुम्ही बघितली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2016 22:24 IST

येत्या डिसेंबरमध्ये आई होणारी करिना कपूर म्हणजे खरोखरीच बिझी मम्मी म्हणायला हवी. मातृत्व रजा घेण्याआधी हाती असलेले काम करिना ...

येत्या डिसेंबरमध्ये आई होणारी करिना कपूर म्हणजे खरोखरीच बिझी मम्मी म्हणायला हवी. मातृत्व रजा घेण्याआधी हाती असलेले काम करिना संपवू इच्छिते. करिनाच्या हाती असलेल्या या प्रोजेक्टमध्ये बरेचसे कमर्शिअल शूट वा फोटोशूटचा समावेश आहे. सप्टेंबरपूर्वी करिनाला हातातले सगळे काम संपवायचे आहे. आज करिना एक अ‍ॅड शूट करताना दिसली. मुंबईच्या एका स्टुडिओत मोनोक्रोम गाऊनमधील करिना कधी नव्हे इतकी सुंदर दिसली. विशेष म्हणजे, फोटोग्राफर्सपासून दूर पळण्याऐवजी ती मस्तपैकी कॅमेºयाला सामोरे गेली. मग काय, तिच्या हास्याने सगळेच घायाळ झालेत.'