Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रसिद्ध खलनायक 'गब्बर'च्या लेकीला पाहिलंत का?, तीदेखील अभिनेत्री असून दिसते खूप सुंदर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2021 07:00 IST

अमजद खान यांच्या कुटुंबाविषयी फार कमी लोकांना माहित आहे.

'शोले' चित्रपट म्हटलं तर डोळ्यांसमोर येतात ते गब्बर सिंग, जय-वीरू, बसंती, सांबा. शोलेचा उल्लेख झाला तर गब्बर सिंगचा उल्लेख होणार नाही असे होऊ शकत नाही. या चित्रपटातील 'सो जा बेटा नहीं तो गब्‍बर आ जाएगा' हा संवाद आजही तितकाच लोकप्रिय आहे जितका त्यावेळी झाला होता. इतकी गब्बर सिंगचा रोल प्रभाव करून गेली आहे. ही भूमिका साकारणारे अभिनेते अमजद खान हे तर या भूमिकेमुळे अजरामर झाले आहेत. याच गब्बरची लेक खूप सुंदर आहे. अमजद खान यांच्या मुलीचे नाव आहे अहलम खान.

बॉलिवूडमधील सर्वाधीक लोकप्रिय 'शोले' या चित्रपटात गब्बर ही खलनायकाची भूमिका साकारल्यानंतर अमजद खान खूपच हिट झाले.

मात्र अमजद खान यांच्या कुटुंबाविषयी फार कमी लोकांना माहित आहे. त्यांना दोन मुलगे आणि एक मुलगी आहे. त्यांच्या मुलीचे नाव आहे अहलम खान.

अहलम ही एक थिएटर आर्टिस्ट आहे आणि काही वर्षापूर्वी तिने थिएटर आर्टिस्ट आणि हिप हिप हुर्रे फेम जफर करांचीवालासोबत लग्नगाठ बांधली.

अहलम खान हीदेखील अभिनेत्री असून दिसायला खूप सुंदर आहे. तिने सिनेमात देखील काम केले आहे. आता ती रंगमंचाच्या माध्यमातून आपली आवड जपताना दिसते आहे.

टॅग्स :अमजद खान