Join us

Funfact: नीतू सिंग यांचा चेहरा अन् हेअर ड्रेसरचा हात...!!     

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2019 10:21 IST

एका फोटोशूटवेळी असे काही केले गेले की, नीतू आजही तो मजेशीर किस्सा विसरू शकल्या नाहीत.  

ठळक मुद्देनीतू यांनी 1972मध्ये ‘रिक्शावाला’ सिनेमामधून त्यांनी अभिनेत्री म्हणून करिअरला सुरूवात केली. 

बॉलिवूड सेलिब्रिटींना किती छोट्या-छोट्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते, याची कल्पनाही तुम्ही आम्ही करू शकत नाही. अनेकदा यातून काही मजेशीर प्रसंग उद्भवतात. आता नीतू कपूर यांचाच किस्सा घ्या. एका फोटोशूटवेळी असे काही केले गेले की, नीतू आजही तो मजेशीर किस्सा विसरू शकल्या नाहीत.  होय, करिअरच्या शिखरावर असताना नीतू यांनी एका मॅगझिनसाठी फोटोशूट केले होते. या फोटोशूअचा एक फोटो मॅगझिनच्या कव्हरपेजवर प्रकाशित झाला. पण या कव्हर पेजवरील फोटोत जो हात होता, तो नीतूंचा नसून त्यांच्या हेअर ड्रेसरचा होता. आश्चर्य वाटले ना? पण हे खरे आहे.  

अलीकडे नीतू यांनी आपल्या इन्स्टाग्रामवर या कव्हर पेजचा फोटो शेअर करत, हा खुलासा केला होता. ‘दिग्गज फोटोग्राफर राकेश श्रेष्ठा यांनी माझे हे फोटोशूट केले होते. माझी लाल लिपस्टिक आणि लाल नेलपॉलिश असा त्यांचा कॉन्सेप्ट होता. पण त्यावेळी माझी नखे कापलेली होती. यासाठी आम्ही माझ्या हेअरड्रेसरचा हात वापरला. हाताचा पोश्चर खूपच विचित्र दिसतो आहे,’असे नीतू यांनी हा फोटो शेअर करत सांगितले.

नीतू यांनी 1972मध्ये ‘रिक्शावाला’ सिनेमामधून त्यांनी अभिनेत्री म्हणून करिअरला सुरूवात केली. ‘यादो की बारात’ सिनेमामधून त्यांना खरी ओळख मिळाली. 1975मध्ये पहिल्यांदा त्यांचा ऋषी कपूर यांच्यासह ‘खेल खेल में’ हा सिनेमा रुपेरी पडद्यावर झळकला.

नीतू यांनी आपल्या काळात ऋषी कपूर यांच्यासह 11 सिनेमे केले. ऋषीसह काम करतात करता नीतू सिंह त्यांच्या प्रेमात पडल्या आणि 1979मध्ये दोघांनी लग्न केले. लग्नानंतर नीतू सिंहने केवळ ऋषी कपूर यांच्यासह काम केले.

टॅग्स :नितू सिंगऋषी कपूर