Join us
Daily Top 2Weekly Top 5

शिल्पा शेट्टीही घेणार होती राज कुंद्रापासून घटस्फोट? मेसेज करुन आईला सांगितले होते कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2021 16:21 IST

राज कुंद्रा पोर्नोग्राफी प्रकरणाबाबत शिल्पा शेट्टीला मुंबई गुन्हे शाखेने चौकशीसाठी बोलावले होते. शिल्पा शेट्टीचीही यावेळी कसून चौकशी केली गेली.

आपल्या अभिनयाने तसंच सौंदर्याने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवणारी अभिनेत्री शिल्पा शेट्टी सध्या पती राजकुंद्रा पॉर्नोग्राफी प्रकरणामुळे चर्चेत आहे. पती राज कुंद्राला अटक झाल्यानंतर शिल्पा शेट्टीही अडचणीत येण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. पोर्नोग्राफी प्रकरणाबाबत शिल्पा शेट्टीला मुंबई गुन्हे शाखेने चौकशीसाठी बोलावले होते. शिल्पा शेट्टीचीही यावेळी कसून चौकशी केली गेली.

 

राज कुंद्राच्या या प्रकरणाचा फटका शिल्पा शेट्टीलाही बसला आहे.राजच्या अटकेनंतर बरेच मोठे ब्रँंड्स आता शिल्पाच्या हातून निसटले आहेत. याशिवाय ती सुपर डान्सर्स या शोची परीक्षक देखील आहे. पतीच्या अटकेनंतर तिने शूटिंगही रद्द केले आहे.गेल्याच आठवड्यात झालेल्या या शोच्या विशेष भागात शिल्पाच्या जाही करिश्मा कपूर दिसली होती.

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राशी संबंधित असाच एक किस्सा समोर आला आहे. जो फारसा कोणाला माहितीही नसणार. 2019 मध्ये 'सुपर डान्स 3' चा शोच्या वेळचा हा किस्सा आहे अनुराग बासू यांनी शिल्पा शेट्टीची फिरकी घ्यायचे ठरवले होते.

अनुराग बासुने शिल्पा शेट्टीच्या मोबाईलवरुन तिच्या आईला राज कुंद्रासोबत घटस्फोट घेत आहे असा लपून मेसेज केला होता. याविषयी शिल्पाला अजिबात कल्पना नव्हती. मेसेजमध्ये लिहीले होते की, राज कुंद्रासह वाद निर्माण झालाय.या वादाला कंटाळून घटस्फोट घेत असल्याचे लिहीले होते.

शिल्पाच्या आईला देखील हा मेसेज वाचून मोठा धक्काच बसला होता.आईने यावर विचारणा केल्यानंतर शिल्पा शेट्टीही हैराण झाली. चिंतेत असलेल्या शिल्पाला पाहून अनुराग बासुनेच शेवटी ही मस्करी केल्याचे शिल्पाला सांगितले. मजा मस्तीमध्ये शिल्पाच्या मोबाईलवरुन आईला मेसेज केल्याचे अनुरागने सांगितले.मात्र शिल्पा यामुळे अनुराग बासुवर प्रचंड रागावली होती.

अशा प्रकारची मजा मस्ती करणे तिला अजिबात आवडले नव्हते.यानंतर लगेचच शिल्पाने आईला घडलेल्या प्रकाराबद्दल सांगितले. मेसेज तिने केलेला नसून अनुराग बासुने तिच्या मोबाईलवरुन केल्याचे सांगितले. तसेच अशाप्रकारचे मेसेज भविष्यात आले तरी यावर विश्वास ठेवायचा नाही असेही शिल्पाने आईला सांगितले होते.

टॅग्स :शिल्पा शेट्टीराज कुंद्रा