Join us
Daily Top 2Weekly Top 5

वडील आमिर खानसारखे लेक जुनैदनेदेखील केलंय गुपचूप लग्न?, नात्याबद्दल केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 12:20 IST

Aamir Khan Son Junaid Khan : आमिर खानचा मुलगा जुनैद खानने बॉलिवूडमध्ये एंट्री केली आहे. त महाराज हा त्याचा पहिला चित्रपट. यानंतर त्याचा दुसरा चित्रपट लवयापा रिलीजसाठी सज्ज आहे.

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान(Aamir Khan)चा मुलगा जुनैद खान(Junaid Khan)ने बॉलिवूडमध्ये एंट्री केली आहे.  महाराज हा त्याचा पहिला चित्रपट. यानंतर त्याचा दुसरा चित्रपट लवयापा रिलीजसाठी सज्ज आहे. या चित्रपटात जुनैदसोबत खुशी कपूर (Khushi Kapoor) मुख्य भूमिकेत दिसणार आहे. जुनैद आणि खुशी दोघेही सध्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. प्रमोशन दरम्यान, जुनैदला सीक्रेट लग्नाबद्दल विचारले असता त्याने याबद्दल मोकळेपणाने सांगितले.

जुनैदने सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगितले. सिद्धार्थने जुनैदला विचारले की, त्यानेपण वडील आमिर खान यांच्यासारखे गुपचूप लग्न केले आहे आणि ते लपवत आहे का? त्यावर जुनैद म्हणाला की, त्याच्या वडिलांनाही लग्नाची गोष्ट कोणापासून लपवायची नव्हती. त्यांना निर्मात्यांनी ते लपवण्यास सांगितले होते. चित्रपट प्रदर्शित होईपर्यंत लग्नाबाबत मौन बाळगण्यास सांगितले होते. त्यांचे हात दगडाखाली होते. जुनैदनेदेखील कोणतेही सीक्रेट लग्न केले नसल्याचा खुलासा केला आहे. 

या कारणामुळे आमिर खानने केलं होतं गुपचूप लग्न

आमिर खानने बालकलाकार म्हणून सिनेइंडस्ट्रीत प्रवेश केला होता. कयामत से कयामत तक हा त्याचा पहिला ब्लॉकबस्टर चित्रपट होता. रिलीजच्या दोन वर्षांपूर्वी आमिरने रिना दत्ताशी लग्न केले. कयामत से कयामत तक रिलीज होईपर्यंत आमिरला त्याचे लग्न सीक्रेट ठेवण्यास सांगितले होते. कयामत से कयामत तक या चित्रपटानंतर आमिरच्या लग्नाची बातमी समोर आली होती.

'लवयापा'बद्दललवयापाबद्दल बोलायचे झाले तर हा चित्रपट ७ फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे. ही एक आधुनिक प्रेमकथा आहे. ज्यामध्ये जुनैद आणि खुशीची जोडी खूप पसंत केली जात आहे. लवयापाचा ट्रेलर आणि गाणी खूप आवडली.

टॅग्स :आमिर खानजुनैद खान