सामंथा रूथ प्रभु ( Samantha Ruth Prabhu) ही साऊथची आघाडीची नायिका. जगभर तिचे असंख्य चाहते. पण तरिही चित्रपटांपेक्षा पर्सनल लाईफमुळेच तिची अधिक चर्चा झाली. 2017 मध्ये तिने नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्यसोबत ( Naga Chaitanya) लग्नगाठ बांधली आणि अचानक चर्चेत आली. या ग्रँड वेडिंगची अनेक दिवस चर्चा होती. पण चार वर्षांतच सामंथा व नागा यांच्यात असं काही बिनसलं की, दोघांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला आणि तो अमलातही आणला. काल सामंथा व नागा दोघांनीही सोशल मीडियावर घटस्फोटाची घोषणा केली.
नागाच्या प्रेमात पडणारी, त्याच्यासोबत लग्नगाठ बांधणारी आणि आता घटस्फोट घेणारी सामंथा कधीकाळी ‘रंग दे बसंती’ फेम साऊथ अॅक्टर सिद्धार्थच्या ( Siddharth) प्रेमात वेडी होती. इतकी की, दोघंही लिव्ह-इनमध्ये राहत होते. अडीच वर्ष दोघंही एकमेकांसोबत लिव्ह इनमध्ये असतानाच दोघाचं ब्रेकअप झालं. अर्थात या ब्रेकअपमागचं खरं कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे. यावर ना कधी सामंथा बोलली, ना सिद्धार्थ.पण आता सामंथा व नागाच्या घटस्फोटानंतर मात्र सिद्धार्थने अप्रत्यक्षपणे आपल्या मनातील भडास काढली आहे. होय, सामंथाचा एक्स-बॉयफ्रेन्ड सिद्धार्थचं एक ट्विट सध्या व्हायरल होतंय.