Join us

सल्लूमियाँने पाहिला नाही ‘ऐ दिल..’ चा टीझर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2016 10:40 IST

दोन दिवसांपूर्वी ‘ऐ दिल हैं मुश्किल’ चित्रपटाचा टीझर आऊट झाला. आणि ‘बी टाऊन’मधून कौतुकाला आणि टीकेलाही सुरूवात झाली. रणबीर ...

दोन दिवसांपूर्वी ‘ऐ दिल हैं मुश्किल’ चित्रपटाचा टीझर आऊट झाला. आणि ‘बी टाऊन’मधून कौतुकाला आणि टीकेलाही सुरूवात झाली. रणबीर आणि ऐश्वर्या रॉय बच्चन यांच्यातील इंटीमेट सीनमुळे चर्चेला उधाण आले. या सीनला तर बच्चन कुटुंबियांनीही विरोध दर्शवला.चित्रपटाचा टीझर सलमान खानने पाहिला की नाही? असे त्याला पत्रकार परिषदेत विचारले असता त्याचे उत्तर थोडेसे विचित्रच होते. तो नेहमीप्रमाणे हसला आणि म्हणाला,‘ मी पाहिला नाही अद्याप. तुम्ही पाहिलाय का, मग मलाही सांगा नेमका कसा आहे?’सलमानची अशी प्रतिक्रिया अगदीच अपेक्षित नव्हती. त्याला नेमके काय सांगायचे आहे हेच कळत नाहीये. दिग्दर्शक करण जोहर यांच्या ‘ऐ दिल हैं मुश्किल’ चित्रपटात अनुष्का शर्मा आणि फवाद खान हे देखील असणार आहेत. चित्रपट २८ आॅक्टोबरला रिलीज होणार आहे.