प्रसिद्ध बॉलिवूड गायक कुमार सानू (Kumar Sanu) त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहेत. त्यांनी रीटा भट्टाचार्य यांच्याशी लग्न केले होते, पण 'दामिनी' चित्रपटातील अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री (Meenakshi Sheshadri) सोबतही त्यांचे संबंध असल्याची चर्चा होती. मीनाक्षीसोबतच्या अफेअरमुळेच कुमार सानू यांचा पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट झाल्याचेही सांगितले जाते.
कुमार सानू आणि मीनाक्षी शेषाद्री यांची पहिली भेट महेश भट यांच्या 'जुर्म' चित्रपटाच्या प्रीमियरमध्ये झाली होती. याच चित्रपटासाठी कुमार सानू यांनी 'जब कोई बात बिगड़ जाए' हे गाणे गायले होते, ज्यात मीनाक्षी शेषाद्री आणि विनोद खन्ना होते. तेव्हापासूनच कुमार सानू आणि मीनाक्षी यांच्या डेटिंगची चर्चा सुरू झाली. त्यावेळी, त्यांच्या सेक्रेटरींनीही या गोष्टीला दुजोरा दिला होता आणि सांगितले होते की, ''कुमार सानू यांच्या अनेक गर्लफ्रेंड्स आहेत, पण सध्या ते प्रसिद्ध अभिनेत्री मीनाक्षीला डेट करत आहेत.'' मात्र, नंतर मीनाक्षीने हरीश मैसूर नावाच्या इन्व्हेस्टमेंट बँकरसोबत लग्न केले.
कुमार सानू यांचे 'वुमनायझर' आरोपावर स्पष्टीकरण'सिद्धार्थ कनन'ला दिलेल्या मुलाखतीत प्रसिद्ध गायक कुमार सानू यांना 'वुमनायझर' (अनेक स्त्रियांशी संबंध ठेवणारा) असल्याच्या आरोपाबद्दल विचारले असता, ते म्हणाले, "मी आयुष्यात अनेक वेळा ऐकले आहे की मी 'वुमनायझर' आहे. तुम्हाला माहीत आहे, माझ्या दुसऱ्या पत्नी सलोनीसोबतच्या लग्नाला २३ वर्षे झाली आहेत. या २३ वर्षांत तुम्ही माझ्याबद्दल दुसऱ्या कोणत्याही महिलेचे नाव ऐकले आहे का? या सर्व फक्त अफवा आहेत."
पहिल्या लग्नाच्या घटस्फोटाचं कारणगायकाला जेव्हा विचारले गेले की, अभिनेत्रीसोबतच्या अफेअरमुळे त्यांचे पहिले लग्न तुटले का? तेव्हा त्यांनी उत्तर दिले, "माझे लग्न तुटले, ते आमच्या दोघांमधील वैयक्तिक कारण होते. त्यात कोणाचाही सहभाग नव्हता. मी मीनाक्षी शेषाद्रीला कधीही भेटलो नाही, ना पाहिले, ना तिने मला पाहिले. आमची कधीच भेट झाली नाही. माझे नाव तिच्यासोबत जोडले गेल्यामुळे ती हसत असेल."
कुनिका सदानंदसोबतही जोडलं गेलं नाव याव्यतिरिक्त, अभिनेत्री कुनिका सदानंद हिचे नावही कुमार सानू यांच्यासोबत जोडले गेले होते. सध्या कुनिका 'बिग बॉस १९'मध्ये आहेत आणि आपल्या भूतकाळातील आयुष्याबद्दल अनेक खुलासे करत आहे.