Join us

चक्क कॅटने केली रणबीरला मदत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2016 10:53 IST

 काय वाचताय यावर विश्वास बसत नाहीये ना? पण, तुम्ही जे वाचताय ते अगदी खरंय... रणबीर कपूर आणि कॅटरिना कैफ ...

 काय वाचताय यावर विश्वास बसत नाहीये ना? पण, तुम्ही जे वाचताय ते अगदी खरंय... रणबीर कपूर आणि कॅटरिना कैफ हे दोघे ‘जग्गा जासूस’ चित्रपटासाठी शूटिंग करत आहेत. काही महिन्यांपासून त्यांचे ब्रेकअप झाल्याने चित्रपटाची शूटिंग रखडत रखडतच सुरू आहे.पण, नुकतीच एका गाण्याची शूटींग सुरू असताना रणबीरला डान्स स्टेप्स जमत नव्हत्या. म्हणून चक्क कॅटरिनाने त्याला डान्स स्टेप्स समजून सांगण्यासाठी मदत केली. ते सध्या मोरोक्कोत त्यांच्या चित्रपटाची शूटींग करत आहेत.तिने समजावून सांगितल्यावर मात्र तो शॉट पूर्ण होऊ शकला. म्हणजे असे म्हणायला हरकत नाहीये की, आता ते दोघे पुन्हा हळूहळू एकत्र येऊ  पाहत आहेत.