एक्स-बॉयफ्रेन्डसोबत हातात हात घालून फिरताना दिसली डायना पेंटी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2018 14:57 IST
अभिनेत्री डायना पेंटी हिने काल सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पण एखाद्या इव्हेंटमधील आगळ्या-वेगळ्या स्टाईलमुळे किंवा कुठल्या चित्रपटातील भूमिकेमुळे नव्हे ...
एक्स-बॉयफ्रेन्डसोबत हातात हात घालून फिरताना दिसली डायना पेंटी!
अभिनेत्री डायना पेंटी हिने काल सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पण एखाद्या इव्हेंटमधील आगळ्या-वेगळ्या स्टाईलमुळे किंवा कुठल्या चित्रपटातील भूमिकेमुळे नव्हे तर तिच्या ‘एक्स’मुळे. होय, डायनाने लक्ष वेधून घेतले, ते तिच्यासोबत असलेल्या व्यक्तिमुळे. काल रात्री डायना तिचा एक्स बॉयफ्रेन्ड हर्ष सागर याच्यासोबत हातात हात घालून दिसली. आता एक्स बॉयफ्रेन्डसोबत डायना हातात हात घालून हिंडत असेल तर चर्चा तर होणारच. त्याचीच चर्चा झाली. खरे तर डायना व हर्षचे ब्रेकअप झाल्याची बातमी फार पूर्वीच येऊन गेली होती. काही वर्षांपूर्वी डायना व हर्ष रिलेशनशिपमध्ये होते. हिºयांचा व्यापारी असलेल्या हर्षसोबत डायना लग्न करणार, इथपर्यंत बोलले गेले होते. पण अचानक दोघांच्याही ब्रेकअपची बातमी येऊन धडकली आणि त्यानंतर डायना कधीच हर्षसोबत दिसली नाही.पण काल अचानक डायना हर्षसोबत दिसली अन् सगळ्यांच्याच भूवया उंचावल्या. मुंबईच्या एका रेस्टॉरंटमधून दोघेही बाहेर पडले. तेही हातात हात घालून. यावेळी हर्ष तर मोबाईलवर बिझी होता. पण डायना मात्र फोटोग्राफरला पोझ देताना कमालीची आनंदी दिसली. हर्षसोबत मीडिया आपले फोटो काढतो आहे, यावर तिचा काहीही आक्षेप नव्हता. मीडियाला ती अगदी सहज सामोरी गेली. यावेळी डायनाने करड्या रंगाचा काश्मिरी कुर्ता घातला होता. हर्ष व डायना यांच्यात सध्या काय शिजतेय, ते तर आम्हाला ठाऊक नाही. पण दोघांचेही पॅचअप झालेय, इतके मात्र नक्की. किमान डायनाच्या चेह-यावरचा आनंद तरी हेच सांगतोय.ALSO READ : 'परमाणु' चित्रपटातला डायना पेंटीचा हा अंदाज तुम्ही पाहाच!‘कॉकटेल’मध्ये एका सरळ साध्या मुलगी मीराचा भूमिका साकारणारी डायना ‘हैपी भाग जाएगी‘ या चित्रपटात शेवटची दिसली होती. लवकरच ती ‘परमाणु : द स्टोरी आॅफ पोखरण’मध्ये दिसणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या या चित्रपटाची चर्चा आहे. यात डायना एका मिल्ट्री आॅफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे. यात जॉन अब्राहम लीड रोलमध्ये आहे.