Join us
Daily Top 2Weekly Top 5

ट्रान्सपरंट ड्रेसमध्ये दिसली अभिनेत्री, सोशल मीडियावर झाली ट्रोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 18:24 IST

या अभिनेत्रीला नुकतेच विमानतळावर पाहाण्यात आले

ठळक मुद्देलग्नानंतर दियाला नुकतेच विमानतळावर पाहाण्यात आले. पण विमानतळावर तिने घातलेल्या कपड्याचीच सोशल मीडियावर अधिक चर्चा रंगली होती. कारण तिने विमानतळावर घातलेले कपडे खूपच ट्रान्सपरंट होते.

बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा नुकतीच चांगलीच चर्चेत आली आहे. तिचे पहिले लग्न साहिल संघासोबत झाले होते. पण काही वर्षांपूर्वी त्यांनी वेगळे व्हायचा निर्णय घेतला. तिने नुकतेच वैभव रेखीसोबत लग्न केले आहे. वैभव हा व्यवसायिक असून त्याचे देखील हे दुसरे लग्न आहे. 

लग्नानंतर दियाला नुकतेच विमानतळावर पाहाण्यात आले. पण विमानतळावर तिने घातलेल्या कपड्याचीच सोशल मीडियावर अधिक चर्चा रंगली होती. कारण तिने विमानतळावर घातलेले कपडे खूपच ट्रान्सपरंट होते. त्यामुळे तिला सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल करण्यात आले. 

दिया आणि वैभवच्या लग्नातील फोटो आणि व्हिडीओंनी तर इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. दीयाचे लग्न अनेकार्थाने खास ठरले. तिच्या लग्नात एका महिला पुजारीने सगळ्या विधी केल्या. शिवाय लग्नातील सगळ्या वस्तू इकोफ्रेंडली होत्या. प्लास्टिक आणि थर्माकॉलचा वापर पूर्णपणे टाळण्यात आला होता. आणखी खास बात म्हणजे, दीयाच्या लग्नात कन्यादान आणि पाठवणी या दोन पारंपरिक विधींना फाटा देण्यात आला होता.

दीयाचा पती वैभव हा मुंबईतील एक प्रसिद्ध उद्योजक आहे. दीयाप्रमाणेच वैभवचे देखील हे दुसरे लग्न आहे. सुनैना रेखी असे त्याच्या पहिल्या पत्नीचं नाव आहे. ती एक योगा कोच आहे. बॉलिवूड सिनेसृष्टीतील अनेक नामांकित कलाकारांना ती योगाचे प्रशिक्षण देते. अंतर्गत मतभेदांमुळे त्यांचा घटस्फोट झाला होता.

दियाने अनेक चित्रपटांमध्ये काम केले असले तरी रहना है तेरे दिल में मधील तिची भूमिका प्रेक्षकांना अधिक भावते. दीयाच्या अभिनयापेक्षा त्याच्या सौंदर्याची अधिक चर्चा रंगते.

दीयाचे पहिले लग्न साहिल संघासोबत झाले होते. त्यानंतर दोघे ११ वर्षे एकत्र राहिल्यानंतर २०१९ मध्ये सोशल मीडियावर विभक्त होत असल्याचे सांगितले होते. दीया मिर्झा आणि साहिल संघा या दोघांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. त्यात त्यांनी सांगितले होते की, आम्ही वेगळे होत आहोत पण आमच्यात मैत्रीचे नाते नेहमीच राहील. आम्ही कायदेशीररित्या वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र आम्ही नेहमी चांगले फ्रेंड्स राहणार आहोत आणि नेहमी एकमेकांचा आदर करणार आहोत.

टॅग्स :दीया मिर्झा