Join us
Daily Top 2Weekly Top 5

"धुरंधर टीव्हीवर आला की बघेल..."; प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शकाचं मोठं विधान, काय म्हणाला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 13:32 IST

'धुरंधर' विषयी प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शकाने मोठं विधान केलं आहे. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत

'धुरंधर' चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई आहे. अनेकांनी हा सिनेमा पाहून चांगलंच कौतुक केलं आहे. अशातच 'धुरंधर' पाहून बॉलिवूडमधील एका नामवंत दिग्दर्शकाने ''धुरंधर थिएटरमध्ये नाही तर टीव्हीवर बघेल'', असं विधान केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 'कल हो ना हो', 'बाटला हाऊस' सारख्या लोकप्रिय सिनेमांचे दिग्दर्शक निखिल अडवाणी यांनी हे विधान केलंय. जाणून घ्या काय म्हणाले निखिल?

प्रसिद्ध दिग्दर्शक निखिल अडवाणी यांनी एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. या मुलाखतीदरम्यान निखिल यांना विचारण्यात आले की, ते सध्या प्रदर्शित झालेले चित्रपट पाहणार का? त्यावर उत्तर देताना त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, "मी 'धुरंधर' हा चित्रपट टीव्हीवर किंवा ओटीटीवर आल्यावर पाहीन, पण मी चित्रपटगृहात जाऊन 'इक्कीस' हा चित्रपट पाहण्यास प्राधान्य देईन. अनेकांनी धुरंधर पाहून आनंद अनुभवला आहे. आदित्य धर एक चांगला दिग्दर्शक आहे. पण मी धुरंधरच्या ऐवजी इक्कीस थिएटरमध्ये आवर्जून बघेल."

निखिल अडवाणी यांच्या या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 'धुरंधर' हा सध्याचा सर्वात मोठा चर्चेतील चित्रपट असताना तो थिएटरमध्ये न पाहता टीव्हीवर पाहणार असे म्हणणे, हा एक प्रकारचा 'टोला' असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. दुसरीकडे, 'इक्कीस' चित्रपटात धर्मेंद्र आणि अगस्त्य नंदा यांची प्रमुख भूमिका असून त्याचे दिग्दर्शन श्रीराम राघवन यांनी केले आहे. धर्मेंज्र यांचा शेवटचा सिनेमा म्हणून 'इक्कीस'कडे पाहिलं जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : "Dhurandhar" on TV: Bollywood director's surprising statement sparks debate.

Web Summary : Director Nikhil Advani's remark about watching "Dhurandhar" on TV, not in theaters, stirred controversy. He prefers watching " इक्कीस" in theaters. Many see it as a subtle dig at "Dhurandhar."
टॅग्स :निखिल अडवाणीबॉलिवूडधुरंधर सिनेमारणवीर सिंगअक्षय खन्नाधमेंद्र