Dhurandhar 2: The Revenge - Box Office Collection Day 8 : 'धुरंधर २: द रिव्हेंज' (Dhurandhar 2: The Revenge) हा चित्रपट १९ मार्च रोजी जगभरात प्रदर्शित झाला. सध्या जगभरात 'धुरंधर २: द रिव्हेंज'चीच चर्चा असून हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दररोज नवनवीन विक्रम प्रस्थापित करत आहे. 'धुरंधर २: द रिव्हेंज' चित्रपट प्रदर्शित होऊन ८ दिवस झाले आहेत. तरीही चित्रपटाने आपल्या कमाईचा वेग कायम ठेवला असून त्याची घोडदौड थांबण्याचं नाव घेत नाहीये.
'धुरंधर २: द रिव्हेंज' यशाचे नवनवे मापदंड प्रस्थापित करत आहे. 'सॅकनिल्क'च्या रिपोर्टनुसार, ८व्या दिवशी चित्रपटाने भारतात सुमारे ४९.७० कोटींची नेट कमाई केली. यामुळे आतापर्यंतची एकूण भारताची ग्रॉस कमाई ८०५.३२ कोटींवर, तर नेट कमाई ६७४.१७ कोटींवर पोहोचली आहे. परदेशातही आतापर्यंत २६१.९२ कोटींची कमाई झाली आहे. यामुळे 'धुरंधर २: द रिव्हेंज'ची एकूण जागतिक कमाई १०६७.२४ कोटींवर पोहोचली आहे.
विशेष म्हणजे, 'धुरंधर: द रिव्हेंज'नं शाहरुख खानच्या 'पठाण'च्या (१,०५० कोटी) लाइफटाइम कलेक्शनलाही मागे टाकलंय. शिवाय, 'कल्की २८९८ AD' (१,०४२ कोटी), रणबीर कपूरच्या 'अॅनिमल' (९१७ कोटी), श्रद्धा कपूरच्या 'स्त्री २' (८५७ कोटी), विकी कौशलच्या 'छावा' (८०७ कोटी) आणि ऋषभ शेट्टीच्या 'कांतारा: अ लिजेंड चॅप्टर १' (८५२ कोटी) आणि सलमान खानच्या 'बजरंगी भाईजान' (९१८.१८ कोटी) यांसारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांच्या एकूण कमाईला अवघ्या एका आठवड्यात मागे टाकले आहे. लवकरच हा चित्रपट शाहरुख खानच्या 'जवान' (१,१६० कोटी) या चित्रपटांना मागे टाकण्याची शक्यता आहे.
आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर: द रिव्हेंज' हा २०२५ मध्ये आलेल्या 'धुरंधर'चा सिक्वेल आहे. या चित्रपटात रणवीर सिंग मुख्य भूमिकेत असून त्यांच्यासोबत संजय दत्त, आर माधवन, अर्जुन रामपाल, सारा अर्जुन, गौरव गेरा आणि राकेश बेदी यांसारखी स्टारकास्ट आहे.
Web Summary : 'Dhurandhar 2: The Revenge' is a box office smash, earning ₹49.70 crore on its eighth day. The film has surpassed 'Pathaan' and other blockbusters globally, reaching ₹1067.24 crore. Starring Ranveer Singh, it's directed by Aditya Dhar and is a sequel to 'Dhurandhar'.
Web Summary : 'धुरंधर 2: द रिवेंज' बॉक्स ऑफिस पर धमाल मचा रही है, आठवें दिन ₹49.70 करोड़ कमाए। फिल्म ने 'पठान' और अन्य ब्लॉकबस्टर को पछाड़कर विश्व स्तर पर ₹1067.24 करोड़ का आंकड़ा पार कर लिया है। रणवीर सिंह अभिनीत, यह आदित्य धर द्वारा निर्देशित 'धुरंधर' का सीक्वल है।