रणवीर सिंहच्या 'धुरंधर' सिनेमाची क्रेझ काही केल्या कमी होत नाहीये. पाकिस्तानात जाऊन राहिलेल्या भारतीय गुप्तेहर हमझा अली मदारीची कहाणी या सिनेमातून दाखवण्यात आली आहे. हेरगिरी करून गँगस्टर असलेल्या रहमान डकैतच्या दहशतवादी कारवायांची माहिती भारताला पुरवणाऱ्या गुप्तहेराची कहाणी प्रेक्षकांना प्रचंड आवडली. या सिनेमाची क्रेझ पाकिस्तानही आहे. मात्र पाकिस्तानात हा सिनेमा बॅन करण्यात आला आहे. मात्र असं असलं तरी पाकिस्तानी नागरिक रणवीर सिंहचा हा सिनेमा चोरून पाहत आहेत.
एकीकडे प्रदर्शनाच्या इतक्या दिवसांनंतरही भारतात थिएटर हाऊसफूल होत असताना पाकिस्तानात 'धुरंधर' सिनेमा फक्त १६ रुपयांत बघता येत आहे. पाकिस्तानात गेलेल्या एका न्यूझीलंड व्लॉगरने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तो कराचीमधील रेनबो सेंटरमध्ये दिसत आहे. जिथे 'धुरंधर'ची पायरेटेड कॉपी विकली जात आहे. एका दुकानदाराला तो विचारतो हा सिनेमा कितीला मिळेल? तेव्हा दुकानदार त्याला ५० पाकिस्तानी रुपये असं सांगतो. म्हणजे भारतात त्यांची किंमत १६ रुपये आहे. त्यानंतर तो व्लॉगर खूप स्वस्त आहे असं म्हणतो.
'धुरंधर' सिनेमात रणवीर सिंह, आर माधवन, अर्जुन रामपाल, सारा अर्जुन यांच्या मुख्य भूमिका आहेत. ५ डिसेंबरला हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित झाला होता. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवरील अनेक रेकॉर्ड्स मोडले आहेत. काही दिवसांपूर्वीच नेटफ्लिक्सवर हा सिनेमा रिलीज करण्यात आला आहे. तर येत्या १९ मार्चला 'धुरंधर'चा सीक्वल सिनेमागृहात प्रदर्शित होईल.
Web Summary : Despite being banned in Pakistan, Ranveer Singh's 'Dhurandhar' is being watched illegally. A vlogger found pirated copies in Karachi costing only ₹16. The film, about an Indian spy, is a hit in India and has broken box office records.
Web Summary : पाकिस्तान में प्रतिबंधित होने के बावजूद, रणवीर सिंह की 'धुरंधर' मूवी अवैध रूप से देखी जा रही है। कराची में एक व्लॉगर को ₹16 में पायरेटेड प्रतियां मिलीं। भारतीय जासूस पर बनी यह फिल्म भारत में हिट है।