Join us
Daily Top 2Weekly Top 5

'धुरंधर'मुळे स्टार झाली, आता 'शरारत' फेम आयेशा खानला मिळाला मोठा ब्रेक; अक्षय कुमारसोबत 'या' सिनेमात झळकणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 13:52 IST

प्रसिद्धीझोतात आल्यानंतर आयेशा खानचं नशीबच आता उजळून निघालं आहे. अभिनेत्रीला अक्षय कुमारच्या सिनेमात मोठा ब्रेक मिळाला आहे. 

आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' सिनेमाची क्रेझ काही केल्या कमी होत नाहीये. या सिनेमातील गाणीही प्रचंड हिट झाली. 'शरारत' या गाण्यावरील रील्सही प्रचंड व्हायरल झाल्या होत्या. या गाण्याने आयेशा खान आणि क्रिस्टिल डिसुझाला रातोरात प्रसिद्धी मिळवून दिली. प्रसिद्धीझोतात आल्यानंतर आयेशा खानचं नशीबच आता उजळून निघालं आहे. अभिनेत्रीला अक्षय कुमारच्या सिनेमात मोठा ब्रेक मिळाला आहे. 

आयेशा खानच्या हाती मोठा सिनेमा लागला आहे. दिग्दर्शक प्रियदर्शन भागमभागच्या सीक्वलचं प्लॅनिंग करत आहेत. तब्बल २० वर्षांनी या सिनेमाचा सीक्वल येणार आहे. या सिनेमात आयेशा खानची वर्णी लागली आहे. आयेशा या सिनेमात अक्षय कुमारसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. भागमभाग २ मध्ये आयेशा महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. पण या सिनेमात ती कोणती भूमिका साकारणार आहे, याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. आता अक्षय कुमारसोबत आयेशाला बघण्यासाठी तिचे चाहतेही उत्सुक आहेत. 

'धुरंधर'नंतर आयेशा 'किस किस को प्यार करू २' या सिनेमात दिसली होती. आयेशाने छोट्या पडद्यापासून तिच्या अभिनयातील करियरला सुरुवात केली होती. कसौटी जिंदगी की २मध्ये ती दिसली होती. त्यानंतर बालवीर रिटर्न्स या मालिकेत तिने काम केलं होतं. पण 'धुरंधर' मधील 'शरारत' गाण्याने तिला रातोरात स्टार केलं. 

English
हिंदी सारांश
Web Title : Ayesha Khan of 'Shararat' fame lands big break with Akshay Kumar.

Web Summary : Ayesha Khan, famed for 'Shararat,' joins Akshay Kumar in 'Bhagam Bhag 2'. After her success in 'Dhurandhar,' she will play a significant role in the sequel, directed by Priyadarshan. Fans eagerly anticipate seeing her alongside Kumar.
टॅग्स :अक्षय कुमारधुरंधर सिनेमा