Join us
Daily Top 2Weekly Top 5

'धुरंधर'मधील अक्षय खन्नाच्या डान्स स्टेप्स कॉपी? ३६ वर्षांपूर्वीचा पाकिस्तानातील व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 16:15 IST

अक्षय खन्नाच्या "धुरंधर" चित्रपटातील डान्स स्टेप्स व्हायरल झाल्या आहेत.

Akshaye Khanna Viral Dance : सध्या 'धुरंधर' सिनेमाची सर्वत्र चर्चा आहे. हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. सिनेमातील अक्षय खन्नाने साकारलेल्या रहमान डकैत या खलनायकाचं खूप कौतुक होतंय. खलनायक असूनही अक्षयच्या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळतेय. विशेष म्हणजे या सिनेमातील Fa9la हे गाणं सध्या चांगलंच गाजतंय. या गाण्यावर अक्षय खन्नाने केलेला डान्स तर प्रेक्षकांना प्रचंड पसंत पडला आहे. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल, पण अक्षय खन्नाने हा व्हायरल डान्स ३६ वर्षांपूर्वीच्या एका जुन्या व्हिडिओमधून कॉपी केल्याची जोरदार चर्चा आहे.

'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाने जो डान्स केला आहे, त्याचे कोरिओग्राफी कोणी केली नव्हती. शूटिंगदरम्यान त्याने स्वतःच्या मनाने तो डान्स केला आणि आता तो चाहत्यांचा आवडता बनला आहे. पण, या डान्स स्टेप्सची प्रेरणा त्याला त्याचे वडील दिवंगत सुपरस्टार विनोद खन्ना यांच्याकडूनच मिळाली आहे. अक्षय खन्नाच्या डान्स स्टेप्स आणि विनोद खन्ना यांच्या जुन्या डान्स स्टेप्समध्ये असलेले साम्य पाहून चाहते थक्क झाले आहेत.

अक्षय खन्नाने 'धुरंधर'मध्ये केलेल्या डान्ससारखाच डान्स त्याचे वडील विनोद खन्ना यांनी ३६ वर्षांपूर्वी केला होता. लोकांकडून सध्या 'X' पुर्वीचे ट्विटरवर विनोद खन्ना यांचा एक जुना व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे. हा व्हायरल व्हिडीओ १९८९ मध्ये पाकिस्तानातील लाहोरमध्ये एका चॅरिटी कॉन्सर्ट दरम्यानचा आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेता विनोद खन्ना, रेखा, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान आणि क्रिकेटर जावेद मियांदाद हे देखील विनोद खन्नांसोबत नाचताना दिसलेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Akshay Khanna's 'Dhurandhar' dance steps copied from father Vinod Khanna?

Web Summary : Akshay Khanna's dance in 'Dhurandhar' is gaining popularity, with fans noticing similarities to his father, Vinod Khanna's, dance moves from a 1989 charity concert in Lahore. The old video is now viral.
टॅग्स :अक्षय खन्नाविनोद खन्ना