Dhurandhar 2: रणवीर सिंगच्या 'धुरंधर २' या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. हा ट्रेलर पाहून चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे. अॅक्शन, बदला आणि देशभक्तीच्या भावनेने भरलेला हा खुंखार ट्रेलर पाहून अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. काही तासांतच 'धुरंधर २'च्या ट्रेलरला युट्यूबवर काही मिलियन्स व्ह्यूज मिळाले आहेत. बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टही 'धुरंधर २'चा ट्रेलर पाहून भारावून गेली आहे.
'धुरंधर २'चा ट्रेलर आलियाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केला आहे. ट्रेलर शेअर करत ती म्हणते, "बिस्ट मोड ऑन...हा ट्रेलर आऊट ऑफ कंट्रोल आहे". 'धुरंधर २'चा ट्रेलर पाहून आलियाची झोपच उडाली आहे. तिने खाली बॉम्बचे इमोजीही पोस्ट केले आहेत.
'धुरंधर २'चा ट्रेलर
'धुरंधर २'च्या ३.२५ मिनिटांच्या ट्रेलरमध्ये पुन्हा एकदा रणवीर सिंगचा डॅशिंग अवतार पाहायला मिळत आहे. पाकिस्तानात जाऊन राहिलेला भारतीय गुप्तहेर हमजा अलीने रहमान डकैतचा खात्मा केल्यावर ल्यारीमध्ये काय घडतं याची छोटी झलक या आदित्ट्रेलरमधून दिसत आहे. ट्रेलरची सुरुवात "हिंदु बहुतही डरपोक कौम है", या वाक्याने होते. ते ऐकून अजय संन्याल यांच्या तळपायाची आग मस्तकात गेल्याचं दिसत आहे. त्यानंतर एकामागोमाग एक अॅक्शन सीन्स ट्रेलरमध्ये लक्ष वेधून घेत आहेत. "रहमान डकैतच्या मृत्यूनंतर ल्यारीचा बादशाह कोण होणार?" असा प्रश्न पाकिस्तानात निर्माण झाल्याचं दिसत आहे. ल्यारीमध्ये हमजा अली त्याची ताकद आणखी वाढवणार का, याची उत्सुकता सिनेमा पाहताना असेल.
'धुरंधर'मध्ये हमजा अलीचा प्रवास पाहायला मिळाला होता. पण, 'धुरंधर २'मध्ये जसकिरत सिंग रांगी याचा हमजा अली होण्याचा प्रवास आणि त्याची इनसाइड स्टोरी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मात्र 'धुरंधर २'च्या ट्रेलरमधून रहमान डकैतचं पात्र साकारणारा अक्षय खन्ना गायब आहे. त्यामुळे 'धुरंधर २'मध्ये अक्षय खन्ना दिसेल की नाही, याबाबत चाहत्यांना प्रश्न पडला आहे.
आदित्य धरने 'धुरंधर २'चं दिग्दर्शन केलं आहे. या सिनेमात रणवीर सिंग, आर माधवन, सारा अर्जुन, अर्जुन रामपाल, संजय दत्त, दानिश पंडोर, राकेश बेदी हे कलाकार दिसणार आहेत. येत्या १९ मार्चला हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित केला जाणार आहे.
Web Summary : Alia Bhatt was blown away by the trailer of Ranveer Singh's 'Dhurandhar 2', calling it 'out of control' on her Instagram story. The action-packed trailer has garnered millions of views, showcasing Ranveer's dashing avatar as an Indian spy in Pakistan. The film releases on March 19th.
Web Summary : रणवीर सिंह की 'धुरंधर 2' का ट्रेलर देखकर आलिया भट्ट हैरान रह गईं। उन्होंने इसे अपनी इंस्टाग्राम स्टोरी पर 'आउट ऑफ कंट्रोल' बताया। एक्शन से भरपूर ट्रेलर को लाखों व्यूज मिले हैं। फिल्म 19 मार्च को रिलीज होगी।