Dhurandhar 2: आदित्य धरच्या 'धुरंधर : द रिव्हेंज' सिनेमाने प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर धमाका केला आहे. 'धुरंधर २'ने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवरील अनेक सिनेमांचे रेकॉर्ड मोडले आहेत. रणवीर सिंगचा सिनेमा बॉलिवूडमधला सगळ्यात मोठा ओपनर ठरला आहे. 'धुरंधर २'ने इतिहास रचल्यानंतर सिनेमाच्या टीमची सक्सेस पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीत सिनेमातल्या कलाकारांनी हजेरी लावली होती.
'धुरंधर २'च्या सक्सेस पार्टीतील एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओत रणवीर सिंग डान्स करताना दिसत आहे. 'धुरंधर २'मध्ये रणवीर सिंगने पाकिस्तानात जाऊन राहिलेल्या भारतीय गुप्तहेर हमजा अली मदारीची भूमिका साकारली आहे. या सिनेमातील त्याच्या भूमिकेचं प्रचंड कौतुक होत आहे. 'धुरंधर २'ला मिळालेल्या यशानंतर रणवीर सिंगही खूश असल्याचं दिसत आहे. या व्हिडीओमध्ये त्याच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत आहे. 'धुरंधर'मधल्या fa9la गाण्यावर तो डान्स करत असल्याचं पाहायला मिळत आहे.
'धुरंधर २'च्या सक्सेस पार्टीत रणवीर सिंगसोबत आदित्य धर, यामी गौतम, सारा अर्जुन, सौम्या टंडन, अर्जुन रामपाल, संजय दत्त या कलाकारांनीही हजेरी लावली होती. दरम्यान, गुरुवारी पेड प्रिव्ह्यू शोमधून 'धुरंधर २'ने तब्बल ४३ कोटींचा गल्ला जमवला. तर प्रदर्शनाच्या दिवशी १०२ कोटींचा बिजनेस या सिनेमाने केला आहे. आत्तापर्यंत या सिनेमाने १४५ कोटी कमावले आहेत. तर जगभरात 'धुरंधर २'ने तब्बल २३६ कोटी कमावले आहेत.
Web Summary : 'Dhurandhar 2' success party saw Ranveer Singh dancing to a song from the film. The movie has broken records, earning crores worldwide. The success party was attended by the film's cast and crew.
Web Summary : 'धुरंधर 2' की सफलता पार्टी में रणवीर सिंह फिल्म के गाने पर नाचते दिखे। फिल्म ने रिकॉर्ड तोड़कर दुनिया भर में करोड़ों कमाए। सफलता पार्टी में फिल्म के कलाकार और क्रू शामिल हुए।