Dhurandhar 2: आदित्य धरचं दिग्दर्शन असलेला 'धुरंधर : द रिव्हेंज' सिनेमा १९ मार्चपासून सर्वत्र प्रदर्शित झाला. 'धुरंधर'नंतर चाहते 'धुरंधर २' आतुरतेने वाट पाहत आहेत. 'धुरंधर २'ची जिकडेतिकडे चर्चा पाहायला मिळत आहे. या सिनेमातील अनेक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. दाक्षिणात्य अभिनेत्री आणि माजी खासदार असलेल्या रम्या स्पंदना हिने मात्र या 'धुरंधर २' पाहून नाराजी व्यक्त करत आदित्य धरवर टीका केली आहे.
'धुरंधर २' पाहिल्यानंतर रम्याने X अकाऊंटवरुन एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये ती म्हणते, "आत्ताच धुरंधर २ पाहिला... एखादी चांगली कथा कंटाळवाणी कशी बनवायची याचा हा मास्टरक्लासच आहे. हे म्हणजे सगळ्यात बोअरिंग विषयाचं पाठ्यपुस्तक वाचण्यासारखं आहे. ज्यामधली प्रकरणं संपता संपत नाहीत. आणि शेवटी एका क्षणी तुमचा मेंदू थकून जातो आणि समोर चाललेल्या प्रकारावर हसू येऊ लागतं. जर तुम्हाला खरंच धुरंधर २ पाहायचा असेल, तर स्वतःवर उपकार करा. थिएटरमध्ये वेळ आणि पैसे वाया घालवू नका. हा फोनवर स्क्रोल करत बघण्यासारखा सिनेमा आहे. ओटीटीवर पाहण्यासारखा सिनेमा आहे जो तुम्ही कधीही थांबवू शकता".
'धुरंधर २'वर राम्याची टीका
"दिग्दर्शन, संवाद, एडिटिंग, बॅकग्राऊंड स्कोअर, अभिनय सगळंच कमजोर आहे. असं वाटतं की कुणालाच १९ मार्चची रिलीज डेडलाईन आहे हे सांगितलंच नव्हतं किंवा त्यांना माहीत असेल तरीही “हो चालेल, पाठवा” असंच म्हटलं असावं. धुरंधर पार्ट १मध्ये लोक शिट्ट्या मारत होते, टाळ्या वाजवत होते, एन्जॉय करत होते. सिनेमागृहात ऊर्जा होती. प्रेक्षकांची एंगेजमेंट होतं. पण यावेळी तसं काहीच घडलं नाही. थिएटरमध्ये निराशेची भावना स्पष्ट जाणवत होती. आणि जे लोक म्हणत आहेत की रणवीरने चित्रपट त्याच्या खांद्यावर पेलला आहे. नेमकं काय केलंय त्याने? कारण मला तर फक्त त्याचे केसच दिसले! पहिल्या भागात त्या केसांना व्यक्तिमत्त्व होतं. इथे ते फक्त आहेत आणि सगळ्याच्या आड येतात. कदाचित “सपोर्टिंग रोल”साठी नॉमिनेशन मिळेल", असं तिने म्हटलं आहे.
ऑस्कर सोडा थेट नोबेल प्राइज द्या!
पुढे रम्या म्हणते, "आणि हिंसा!!! हा चित्रपट नाही तर एक “व्हिज्युअल हँडबुक” आहे(जे कधी अस्तित्वात असू नये). सिरिंज, स्पॅनर, चाकू, काटेरी बॉल, साखळ्या, बंदुका, बॉम्ब, शटर जे नाव घेऊ ते शस्त्र बनलेलं आहे. दिग्दर्शकाने जणू स्वतःशीच स्पर्धा केलीय असं वाटतं. “पुढचा सीन अजून हिंसक/विनोदी कसा करू?” आणि ते इतकं वाढत जातं की धक्का बसणं थांबतं आणि ते हास्यास्पद वाटायला लागतं. दोन्ही पाय कापले, शरीरावर केरोसिन टाकलं आणि तरीही माणूस भाषण देतोय अशा स्टाईलमध्ये डायलॉग बोलतोय. मेडिकल सायन्स जिंदाबाद! ऑस्कर सोडा, थेट नोबेल प्राईज!".
"थोडक्यात: धुरंधर २ हा प्रचंड निराशाजनक आहे. झोप आणणारा / कॉमेडी वाटणारा चित्रपट. पहिल्या भागाने तुम्हाला टाळ्या वाजवायला लावल्या असतील. धुरंधर २ बघून तुम्ही बोलला का असा चित्रपट बनवला? रणवीर, तू यापेक्षा खूप चांगलं करू शकतोस. आदित्य धर देशभक्ती आणि प्रपोगंडाचा ओव्हरडोस आता जुना झाला. Move on", असं तिने म्हटलं आहे.
Web Summary : Actress Ramya Spandana criticizes 'Dhurandhar 2,' calling it boring and disappointing. She slams the direction, dialogues, and excessive violence, suggesting it's a waste of time and money. She says Ranveer's performance was also unimpressive.
Web Summary : अभिनेत्री राम्या स्पंदना ने 'धुरंधर 2' की आलोचना करते हुए इसे उबाऊ और निराशाजनक बताया। उन्होंने निर्देशन, संवाद और अत्यधिक हिंसा की निंदा की, यह सुझाव देते हुए कि यह समय और पैसे की बर्बादी है। उन्होंने कहा कि रणवीर का प्रदर्शन भी निराशाजनक था।