बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग याचा आगामी चित्रपट 'धुरंधर २' (धुरंधर: द रिव्हेंज) सध्या जोरदार चर्चेत आहे. निर्मात्यांनी ३ फेब्रुवारी रोजी या सिनेमाचा टीझर प्रदर्शित केला असून, त्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. १९ मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणाऱ्या 'धुरंधर २' (धुरंधर: द रिव्हेंज) बाबत आता नव्या चर्चांना उधाण आलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या काही फोटोवरून असा दावा केला जात आहे की, या चित्रपटात बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान झळकणार आहे. पण, या चर्चांमध्ये किती सत्य आहे, ते आपण जाणून घेऊया.
सोशल मीडियावर 'देवायमेशन' नावाच्या एका इंस्टाग्राम अकाउंटवरून काही फोटो शेअर करण्यात आले आहेत. यामध्ये सलमान खान कडक सुरक्षेत एका बाल्कनीमध्ये शूटिंग करताना दिसत आहे. त्याच्यासोबत पहिल्या भागातील महत्त्वाचे कलाकार संजय दत्त (एसपी चौधरी अस्लम) आणि अर्जुन रामपाल (मेजर इक्बाल) देखील दिसत आहेत. हे फोटो पाहून चाहत्यांना वाटलं की, सलमान खरोखरच या चित्रपटाचा भाग आहे.
चाहत्यांच्या माहितीसाठी, सलमान खानचे हे फोटो पूर्णपणे एआय-जनरेटेड आहेत. ही चित्रे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून तयार करण्यात आली असून यात कोणतेही तथ्य नाही. चित्रपटाच्या निर्मात्यांनी किंवा सलमान खानने 'धुरंधर २' मधील सहभागाबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
Web Summary : Rumors of Salman Khan's appearance in 'Dhurandhar 2' are false. Viral photos circulating online are AI-generated. No official announcement confirms his involvement in the film starring Ranveer Singh.
Web Summary : 'धुरंधर 2' में सलमान खान के दिखने की अफवाह झूठी है। ऑनलाइन प्रसारित तस्वीरें एआई-जनरेटेड हैं। रणवीर सिंह अभिनीत फिल्म में उनकी भागीदारी की कोई आधिकारिक घोषणा नहीं है।