Join us
Daily Top 2Weekly Top 5

"कंगनाचा इमर्जन्सी २ दिवसही चालला नाही...", 'धुरंधर २'ला प्रपोगंडा म्हणणाऱ्यांना राकेश बेदींचं स्पष्ट उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 15:03 IST

सोशल मीडियावर 'धुरंधर २'चे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. 'धुरंधर २'ला प्रपोगंडा सिनेमाही म्हटलं जात आहे. या चर्चांवर आता 'धुरंधर २'मधील अभिनेता राकेश बेदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

Dhurandhar 2: 'धुरंधर'नंतर चाहत्यांना आदित्य धरच्या 'धुरंधर : द रिव्हेंज' सिनेमाची उत्सुकता होती. या सिनेमाने प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर धमाका केला. सोशल मीडियावर 'धुरंधर २'चे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. 'धुरंधर २'ला प्रपोगंडा सिनेमाही म्हटलं जात आहे. या चर्चांवर आता 'धुरंधर २'मधील अभिनेता राकेश बेदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

राकेश बेदी यांनी एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत 'धुरंधर २'ला प्रपोगंडा म्हणणाऱ्यांना स्पष्ट शब्दांत उत्तर दिलं आहे. त्यांनी कंगना रणौतच्या इमर्जन्सी सिनेमाचाही यावेळी उल्लेख केला. "मी राजकारणावर विश्वास ठेवत नाही. मी सिनेमावर विश्वास ठेवतो. सिनेमा आवडण्याचा किंवा न आवडण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. पण म्हणून सिनेमाला अशा कुठल्यातरी कॅटेगरीत टाकणं मला योग्य वाटत नाही. लोकांना हा सिनेमा आवडत आहे. अलिकडेच इंदिरा गांधी आणि नरेंद्र मोदी यांच्यावरही सिनेमे आले होते. मात्र ते दोन दिवसही चालले नाहीत. धुरधरंची कथा आणि पटकथा उत्तमप्रकारे लिहिली गेली आहे. असा सिनेमा आजपर्यंत प्रेक्षकांनी पाहिलेला नाही", असं राकेश बेदी म्हणाले. 

दरम्यान, रणवीर सिंगचा सिनेमा बॉलिवूडमधला सगळ्यात मोठा ओपनर ठरला आहे. गुरुवारी पेड प्रिव्ह्यू शोमधून 'धुरंधर २'ने तब्बल ४३ कोटींचा गल्ला जमवला. तर प्रदर्शनाच्या दिवशी १०२ कोटींचा बिजनेस या सिनेमाने केला आहे. आत्तापर्यंत या सिनेमाने १४५ कोटी कमावले आहेत. तर जगभरात 'धुरंधर २'ने तब्बल २३६ कोटी कमावले आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : "Dhurandhar 2" success; Rakesh Bedi slams propaganda claims, mentions "Emergency".

Web Summary : Rakesh Bedi defends "Dhurandhar 2" against propaganda accusations, citing its success. He contrasts it with recent political films, including Kangana Ranaut's "Emergency", which failed to perform well. The film has grossed ₹236 crore worldwide.
टॅग्स :धुरंधर सिनेमारणवीर सिंग