Dhurandhar 2: आदित्य धरच्या 'धुरंधर २' सिनेमाने प्रदर्शित होताच अख्खं मार्केटच खाऊन टाकलं आहे. प्रदर्शनाच्या दिवसापासूनच 'धुरंधर २' रोज नवा रेकॉर्ड बनवत आहे. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर राज्य करत आहे. या सिनेमातील कलाकारांचं कौतुक होत आहे. रणवीर सिंग, सारा अर्जुन, आर माधवन, अर्जुन रामपाल, संजय दत्त यांच्या मुख्य भूमिका आहेत. 'धुरंधर २'मध्ये पाकिस्तानातील काही कलाकारांनीही काम केलं आहे. पाकिस्तानमधील ल्यारीमधले काही कलाकार रणवीरच्या 'धुरंधर २'मध्ये झळकले आहेत. सिनेमातील अभिनेता अभय अरोडाने याबाबत खुलासा केला आहे.
एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत अभय अरोडा म्हणाला, "बँकॉकमध्ये सिनेमाचा काही भाग शूट झाला आहे. यामध्ये एका सीनमध्ये क्राऊड सीन होता. यामध्ये काही लोक असे होते जे खरोखरच पाकिस्तानातील ल्यारीमधले राहणारे होते. जेव्हा ते सेटवर आले तेव्हा आश्चर्यचकित झाले होते. हा सेट ल्यारी सारखाच दिसत होता. ते लोक बँकॉकमध्येच राहणारे होते. त्या सीनसाठी आम्हाला तिथले काही लोक हवे होते. म्हणजे गर्दीत पाठीमागे चालणारे आणि सीनमध्ये चिअर करणारे असे लोक हवे होते. या सगळ्यांचं कास्टिंग बँकॉकमध्येच झालं होतं. पण त्यातील काही लोक हे मूळचे पाकिस्तानातील ल्यारीचे होते. सीनमध्ये दाखवली जाणारी दृश्य ते समजू शकत होते. काही लोक जास्तच आश्चर्यचकित झाले होते. तुमच्यामधलं कधीच कोणी ल्यारीमध्ये गेलं नाही, तरीदेखील सिनेमात दाखवले गेलेले डिटेल्स इतके परफेक्ट कसे काय असं त्यांचं म्हणणं होतं".
'धुरंधर २' या स्पाय-थ्रिलरने चित्रपटाने अवघ्या ६ दिवसांत अनेक बिग बजेट चित्रपटांचे 'लाईफटाईम कलेक्शन'ला मागे टाकलं आहे. भारतातील ग्रॉस कमाई ६८७.४३ कोटींवर पोहोचली असून निव्वळ (नेट) कमाई ५७५.६७ कोटी इतकी झाली आहे. परदेशात या चित्रपटाने आतापर्यंत २३१.५७ कोटींची ग्रॉस कमाई केली आहे. त्यामुळे चित्रपटाची एकूण जागतिक (वर्ल्डवाइड) कमाई ९१९ कोटींवर पोहोचली आहे.
Web Summary : 'Dhurandhar 2' features actors from Pakistan's Lyari, revealed actor Abhay Arora. These actors were part of a crowd scene filmed in Bangkok. The film has grossed ₹919 crore worldwide.
Web Summary : आदित्य धर की 'धुरंधर 2' में पाकिस्तान के ल्यारी के कलाकारों ने काम किया है, अभिनेता अभय अरोड़ा ने खुलासा किया। इन कलाकारों ने बैंकॉक में फिल्माए गए एक भीड़ दृश्य में भाग लिया। फिल्म ने दुनिया भर में ₹919 करोड़ की कमाई की है।