Join us
Daily Top 2Weekly Top 5

Dhurandhar 2 Runtime: 'धुरंधर' की 'धीर धर'? पहिल्या भागापेक्षाही मोठा आहे 'धुरंधर 2', जेवणाची तयारी करूनच जा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 16:10 IST

आता सर्वांना कधी एकदा 'धुरंधर २' थिएटरमध्ये पाहतोय असं झालंय. पण थिएटरमध्ये जाण्याआधी ही बातमी पूर्ण वाचा. कारण पहिल्या भागापेक्षाही 'धुरंधर २' मोठा असणार आहे

आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर २: द रिव्हेंज' या चित्रपटाचा ट्रेलर काहीच दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाचा ट्रेलर इतका जबरदस्त आहे की, आता सर्वांना कधी एकदा 'धुरंधर २' थिएटरमध्ये पाहतोय असं झालंय. पण थिएटरमध्ये जाण्याआधी ही बातमी पूर्ण वाचा. कारण पहिल्या भागापेक्षाही 'धुरंधर २' मोठा असणार आहे. ऑनलाईन तिकिटींग साईट 'बुकमायशो' (BookMyShow) वरील माहितीनुसार, या चित्रपटाचा रनटाइम (Runtime) किती असणार याचा मोठा खुलासा झाला आहे.'धुरंधर २'चा रनटाईम किती?

'बुकमायशो'ने दिलेल्या माहितीनुसार, 'धुरंधर २' जवळपास ४ तासांचा असणार आहे. म्हणजेच 'धुरंधर २'चा अधिकृत रनटाईम ३ तास ५५ मिनिटं इतका असणार आहे.  २०२५ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'धुरंधर'च्या पहिल्या भागाचा रनटाइम ३ तास ३४ मिनिटे होता, ज्यावरून त्यावेळी बरीच चर्चा झाली होती. आता दुसरा भाग पहिल्या भागापेक्षाही मोठा असणार आहे, त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. यापूर्वी २००८ मध्ये प्रदर्शित झालेल्या आशुतोष गोवारीकर यांच्या 'जोधा अकबर'चा रनटाइम ३ तास ३३ मिनिटे इतका मोठा होता.

इतक्या लांबीचा सिनेमा पाहून काही प्रेक्षकांमध्ये धाकधूक आहे, तर 'धुरंधर'च्या चाहत्यांमध्ये या भव्य सिनेमाबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. अनेकांनी 'धुरंधर २' पाहायला जाताना जेवणाची वगैरे सोय करावी लागेल, अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हा चित्रपट सुरुवातीला साऊथ सुपरस्टार यशच्या 'टॉक्सिक' (Toxic) चित्रपटाशी भिडणार होता. मात्र 'टॉक्सिक'ची रिलीज डेट आता ४ जूनपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. यामुळे ईदच्या मुहूर्तावर १९ मार्च रोजी 'धुरंधर २' आता सोलो रिलीज होणार असून, त्याचा मोठा फायदा चित्रपटाला मिळण्याची शक्यता आहे. 'धुरंधर २'ची कोणत्याही सिनेमाशी टक्कर नसणार आहे.

'धुरंधर २' चित्रपटात पुन्हा रणवीर सिंग, संजय दत्त, आर. माधवन आणि अर्जुन रामपाल यांच्या मुख्य भूमिका आहेत. यामी गौतम या चित्रपटात दिसणार की नाही, याबाबत अद्याप निर्मात्यांनी गुप्तता पाळली आहे. चित्रपटाचे 'पेड प्रिव्ह्यू' १८ मार्चपासून सुरू होणार असून, जवळपास ४ तास चालणारा हा 'रिव्हेंज ड्रामा' प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

English
हिंदी सारांश
Web Title : 'Dhurandhar 2' Runtime: A Lengthy Revenge Saga Awaits!

Web Summary : Aditya Dhar's 'Dhurandhar 2: The Revenge' boasts a runtime of 3 hours and 55 minutes, longer than the first film. Starring Ranveer Singh and Sanjay Dutt, the film avoids clashing with 'Toxic' and releases solo on March 19th. Paid previews start March 18th.
टॅग्स :धुरंधर सिनेमारणवीर सिंगअक्षय खन्नाअर्जुन रामपालसंजय दत्तआर.माधवन