Dhurandhar 2: आदित्य धरचं दिग्दर्शन असलेला 'धुरंधर २' सध्या बॉक्स ऑफिसवर राज्य करत आहे. प्रदर्शित होताच 'धुरंधर २'ने बॉक्स ऑफिसवर धमाका केला आहे. 'धुरंधर २'चं आणि त्यातील कलाकारांचंही सर्वत्र कौतुक होत आहे. सोशल मीडियावर या सिनेमातील अनेक व्हिडीओही सध्या व्हायरल होत आहेत. आता 'धुरंधर २'मधला शेवटचा सीन व्हायरल होत आहे.
'धुरंधर २'मध्ये हमजा अली मदारी बनून पाकिस्तानात गेलेला जसकिरत सिंग पुन्हा भारतात परत आल्याचं दाखवलं गेलं आहे. त्यानंतर त्याला पाकिस्तानातील सगळं काही विसरून जाण्याचा सल्ला दिला जातो. त्या सगळ्या आठवणी पुसून नव्या मिशनसाठी त्याला तयार व्हायचं असतं. जसकिरत त्याप्रमाणे तयारही होतो. तो पत्नी आणि मुलाचा फोटो जाळून टाकतो. पण, दुसऱ्या दिवशी तो थेट त्याचं पंजाबमधलं घर गाठतो. डोक्यावर पगडी बांधलेला जसकिरत त्याच्या घराकडे चालत येत असल्याचं दिसतं. तिथे त्याची आई, बहीण आणि दोन मुलं असतात. पण, कोणीही त्याच्याकडे बघत नाही. जसकिरत आणि त्याच्या आईची भेट होणार असं वाटत असतानाच तो परत त्याच्या मार्गाला वळतो. 'धुरंधर २'मधला हा शेवट पाहून प्रेक्षकही हळहळले.
मात्र सोशल मीडियावर आता 'धुरंधर २'च्या या सीनचा AI व्हिडीओ व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमध्ये 'धुरंधर २'चा शेवट बदलण्यात आला आहे. यामध्ये जसकिरतला पाहिल्यानंतर त्याच्या आईला अश्रू अनावर झाल्याचं दिसत आहे. बहीण गच्चीवरुन खाली येते. आणि तिच्या दोन मुलांसह जसकिरतला भेटते, असं दाखवण्यात आलं आहे. त्याबरोबरच शेवटी ते फॅमिली फोटोही काढत असल्याचं दिसत आहे. 'धुरंधर २'मधल्या गोड शेवटाचा हा सीन सर्वत्र व्हायरल होतो आहे.
Web Summary : 'Dhurandhar 2's' altered ending goes viral. The film portrays Jasakirat's return to India, his family reunion, evoking strong emotions. AI-created alternate ending moves viewers.
Web Summary : 'धुरंधर 2' का बदला हुआ अंत वायरल हो गया। फिल्म में जसकिरत की भारत वापसी, उसका पारिवारिक पुनर्मिलन दर्शाया गया है, जो मजबूत भावनाओं को उजागर करता है। एआई द्वारा बनाया गया वैकल्पिक अंत दर्शकों को भावुक कर देता है।