Dhurandhar 2: आदित्य धरच्या 'धुरंधर २'ची चाहत्यांना उत्सुकता आहे. १९ मार्चला 'धुरंधर २' सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. सिनेमा प्रदर्शित व्हायला काही दिवस बाकी असतानाच 'धुरंधर २'च्या क्लायमॅक्सबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. 'धुरंधर'मध्ये पाकिस्तानात जाऊन राहिलेल्या भारतीय गुप्तहेर हमजा अली मदारीची कहाणी दाखवण्यात आली होती. रणीर सिंगने यामध्ये मुख्य भूमिका साकारली होती. आता 'धुरंधर : द रिव्हेंज'मध्ये या भारतीय गुप्तहेराचा हमजा अली बनण्यापर्यंतचा प्रवास आणि रहमान डकैतचा मृत्यू झाल्यानंतरची कहाणी दाखवण्यात येणार आहे. पण, यामध्ये मोठा ट्विस्ट असल्याचं म्हटलं जात आहे.
'धुरंधर २'मध्ये हमजा अलीचा मृत्यू होणार असल्याच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहेत. 'धुरंधर २'चा ट्रेलर रिलीज झाल्यापासूनच या चर्चा सुरू झाल्या आहेत. सिनेमाच्या ट्रेलरमध्ये यलीनाची भूमिका साकारणारी सारा अर्जुन कोणावर तरी बंदूक रोखून उभी असल्याचं दिसत आहे. पण तिने बंदूक कोणावर धरली हे दाखवलेलं नाही. त्यामुळे चाहत्यांनी असा अंदाज व्यक्त केला आहे की यलीनाला हमजाबद्दल खरं काय ते कळलं असेल. आणि म्हणूनच तिने त्याला मारलं असेल. याशिवाय गेहरा हुआ या गाण्यातील "मेरी जन्नता का रास्ता, तू ही तू हुआ..." या लिरिक्समुळे हमजा मरणार असल्याची चर्चा रंगली आहे. आता 'धुरंधर २'मध्ये हमजाला खरंच यमीना मारणार का? त्याचं सत्य त्याला कळणार का? हे थोड्याच दिवसांत कळेल.
दरम्यान, या सिनेमाची प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे. 'धुरंधर' थिएटरमध्ये अजूनही सुरू असताना 'धुरंधर २'देखील आता प्रदर्शित केला जाणार आहे. या सिनेमाचे १८ मार्चला होणारे पेड प्रिव्ह्यू शो हाऊसफूल झाले आहेत. आदित्य धरने 'धुरंधर २'चं दिग्दर्शन केलं आहे. या सिनेमात रणवीर सिंग, आर माधवन, सारा अर्जुन, अर्जुन रामपाल, संजय दत्त, दानिश पंडोर, राकेश बेदी हे कलाकार दिसणार आहेत. येत्या १९ मार्चला हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित केला जाणार आहे.
Web Summary : 'Dhurandhar 2' sparks buzz: Will Hamza die? Ylina's role is questioned. The film explores Hamza's journey and revenge after Rahman's death. The climax promises a twist.
Web Summary : 'धुरंधर 2' में क्या हमजा अली की मौत होगी? ट्रेलर से अटकलें तेज। फिल्म में हमजा की यात्रा और रहमान की मौत के बाद का बदला दिखाया जाएगा। क्लाइमेक्स में बड़ा ट्विस्ट!