Dhurandhar 2: रणवीर सिंगचा 'धुरंधर २' ब्लॉकबस्टर ठरल्यानंतर आता 'धुरंधर ३'च्या चर्चा सुरू झाल्या आहेत. डिसेंबर महिन्यात 'धुरंधर' प्रदर्शित झाल्यानंतर 'धुरंधर २'च्या प्रतिक्षेत प्रेक्षक होते. त्यानंतर आता 'धुरंधर ३'ची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. जून महिन्यात 'धुरंधर ३' रिलीज होणार असल्याच्या काही पोस्टही सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. 'धुरंधर ३'च्या चर्चांवर आता 'धुरंधर'चे कास्टिंग दिग्दर्शक मुकेश छाब्रा यांनी मौन सोडत खरं काय ते सांगितलं आहे.
मुकेश छाब्रा यांनी झूमशी बोलताना 'धुरंधर २'चा पुढचा भाग येणार की नाही? हे सांगूनच टाकलं आहे. ते म्हणाले, "या सगळ्या अफवा आहेत. असं काहीच होणार नाहीये. तसं काही होणार असेल तर X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन त्याची घोषणा करण्यात येईल". रणवीर सिंगच्या अभिनयाचं त्यांनी कौतुकही केलं. "तो एक उत्तम अभिनेता आहे. तो खूप मेहनती आहे. लुटेरा सिनेमाच्या वेळेस मी अनेकदा त्याला भेटलो आहे. त्यानंतर ८३ मध्ये त्याचं कास्टिंग झालं. १५-१६ वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. त्याचे काही जुने फोटो अजूनही माझ्याकडे आहेत. त्याला एक चांगल्या संधीची गरज होती", असंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान, 'धुरंधर २'ची दिवसेंदिवस बॉक्स ऑफिसवरील कमाई वाढत चालली आहे.'धुरंधर: द रिव्हेंज' पेड प्रीव्ह्यूजसह पहिल्यादिवशी १४५ कोटींची दमदार ओपनिंग केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ८३ कोटी, तिसऱ्या दिवशी ११७ कोटी, चौथ्या दिवशी १२१ कोटीचा टप्पा पार करत देशांतर्गत एकूण निव्वळ बॉक्स ऑफिस कमाई ४६६ कोटी झाली. या चित्रपटाने आतापर्यंत देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर ५१९.१२ कोटींचा गल्ला जमवला आहे. आदित्य धरच्या या चित्रपटाने परदेशात २३६.०० कोटींचा टप्पा गाठला असून, यामुळे चित्रपटाची जगभरातील पाच दिवसांची एकूण कमाई अंदाजे ८५६.०० कोटींवर पोहोचली आहे.
Web Summary : Casting director Mukesh Chhabra denies rumors of 'Dhurandhar 3'. He clarifies no sequel is planned, despite 'Dhurandhar 2' success. Chhabra praised Ranveer Singh's talent and hard work. 'Dhurandhar: The Revenge' earned ₹519.12 crore domestically.
Web Summary : कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबड़ा ने 'धुरंधर 3' की अफवाहों का खंडन किया। उन्होंने स्पष्ट किया कि 'धुरंधर 2' की सफलता के बावजूद कोई सीक्वल नहीं बन रहा है। छाबड़ा ने रणवीर सिंह की प्रतिभा और मेहनत की सराहना की। 'धुरंधर: द रिवेंज' ने घरेलू स्तर पर ₹519.12 करोड़ कमाए।