Join us
Daily Top 2Weekly Top 5

Dhurandhar 2: 'धुरंधर २'ची बॉक्स ऑफिसवर त्सुनामी; दोनच दिवसांतच २०० कोटी पार, बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 10:21 IST

पहिल्या दिवशी बक्कळ कमाई केल्यानंतर 'धुरंधर २'ने दुसऱ्या दिवशीही बॉक्स ऑफिस दणाणून सोडलं आहे. 'धुरंधर २'चं दुसऱ्या दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे. 

Dhurandhar 2 Box Office Collection: आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर २'ने प्रदर्शित होताच अख्खं मार्केटच खाऊन टाकलं आहे. पहिल्याच दिवशी 'धुरंधर २'ने बॉक्स ऑफिसवर धुव्वा उडवला आहे. प्रदर्शनाच्या दिवशीच 'धुरंधर २'ने १०० कोटींच्या पेक्षाही जास्त कमाई केली आहे. केवळ देशातच नाही तर परदेशातही सिनेमाची क्रेझ पाहायला मिळत आहे. पहिल्या दिवशी बक्कळ कमाई केल्यानंतर 'धुरंधर २'ने दुसऱ्या दिवशीही बॉक्स ऑफिस दणाणून सोडलं आहे. 'धुरंधर २'चं दुसऱ्या दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे. 

पहिल्या दिवशी १४५ कोटींची कमाई करत 'धुरंधर २' बॉलिवूडचा आत्तापर्यंतचा सगळ्यात मोठा ओपनर ठरला. १९ मार्चला 'धुरंधर २' सर्वत्र प्रदर्शित झाला होता. पण, १८ मार्चला संध्याकाळी ५ वाजल्यापासूनच 'धुरंधर २'चे पेड प्रिव्ह्यू शो आयोजित करण्यात आले होते. गुरुवारी पेड प्रिव्ह्यू शोमधून 'धुरंधर २'ने तब्बल ४३ कोटींचा गल्ला जमवला. तर प्रदर्शनाच्या दिवशी १०२ कोटींचा बिजनेस या सिनेमाने केला आहे. दुसऱ्या दिवशीही 'धुरंधर २'ने चांगली कमाई केली. शुक्रवारी 'धुरंधर २'ने ८० कोटींचा गल्ला जमवला आहे. आत्तापर्यंत २२६ कोटींचा बिजनेस या सिनेमाने केला आहे. आता वीकेंडला सिनेमा किती कमाई करतो, याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. 

'धुरंधर २' हा सिनेमा हिंदी, तेलुगु, तमिळ, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. डिसेंबर २०२५मध्ये 'धुरंधर' प्रदर्शित झाला होता. त्यानंतर आता सिनेमाचा सीक्वल प्रदर्शित करण्यात आला आहे. 'धुरंधर २'मध्ये रणवीर सिंग मुख्य भूमिकेत आहे. त्याने हमजा अली मदारीची भूमिका साकारली आहे. तर संजय दत्त, सारा अर्जुन, आर माधवन, अर्जुन रामपाल यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Dhurandhar 2: Box office tsunami, crosses ₹200 crore in two days

Web Summary : Aditya Dhar's 'Dhurandhar 2' dominates the box office, earning ₹226 crore within two days of release. The film, starring Ranveer Singh, broke Bollywood records with a ₹145 crore opening day. Released in multiple languages, it features Sanjay Dutt and other prominent actors.
टॅग्स :धुरंधर सिनेमारणवीर सिंगसंजय दत्तबॉक्स ऑफिस कलेक्शन