Join us
Daily Top 2Weekly Top 5

'धुरंधर २' हाऊसफुल्ल; बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई, 'धुरंधर ३' येणार? शेवट चुकवू नका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 18:59 IST

क्लायमॅक्समध्ये 'धुरंधर ३'ची मोठी हिंट?

Dhurandhar 2 Ending Hints 3rd Part : दिग्दर्शक आदित्य धरचा 'धुरंधर २' चित्रपट प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. पेड प्रिव्ह्यूमधूनच या चित्रपटाने तब्बल ७५ कोटींची कमाई केली असून हा चित्रपट यंदाच्या वर्षातील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पहिल्याच दिवशी जवळपास १०० कोटींची कमाई होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. प्रेक्षकांची एवढी क्रेझ आहे की, प्रत्येक शो हाऊसफुल्ल होतोय. चित्रपटाच्या क्लायमॅक्समधील काही सीन पाहून प्रेक्षक 'धुरंधर ३'चा संकेत मिळाल्याची चर्चा करत आहेत.

'धुरंधर: द रिव्हेंज' थिएटरमध्ये प्रदर्शित झाला असून, दुसऱ्या भागाबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. अनेक महिन्यांपासून कथेबाबत विविध अंदाज लावले जात होते. मात्र, या भागात असे काही ट्विस्ट दाखवण्यात आले आहेत, जे प्रेक्षकांना अक्षरशः थक्क करतात. क्लायमॅक्समध्ये रणवीर सिंग भारतात परतल्यानंतर कुटुंबाला भेटतो की पुन्हा गुप्तहेर म्हणून नव्याने आयुष्य सुरू करतो, हे स्पष्ट दाखवले जात नाही. यातूनच तिसऱ्या भागाचा इशारा मिळत असल्याचं मानलं जात आहे.

एन्ड क्रेडिटमध्ये आणखी ट्विस्ट

चित्रपट इथेच संपत नाही. एन्ड क्रेडिटमध्ये दोन खास सीन दाखवले आहेत. एका सीनमध्ये जसकीरतला सान्याल आणि त्याची टीम कशी वाचवते आणि त्याला गुप्तहेर म्हणून ट्रेन करते, हे दाखवलं आहे. त्याला विष वापरण्याचंही प्रशिक्षण दिलं जातं. या चित्रपटात रणवीर सिंगसोबत अर्जुन रामपाल, आर माधवन, सारा अर्जुन आणि दानिश इकबाल यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. सध्याच्या ट्रेंडनुसार 'धुरंधर २' हा चित्रपट यंदाचा सर्वात मोठा रेकॉर्डब्रेक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : 'Dhurandhar 2' a Blockbuster; Huge Box Office Success, Part 3 Coming?

Web Summary : 'Dhurandhar 2' is a box office hit, hinting at 'Dhurandhar 3' due to its ambiguous ending and end-credit scenes showing JasKeerat's training. The film's success suggests it could be a record-breaker.
टॅग्स :धुरंधर सिनेमारणवीर सिंग