Join us
Daily Top 2Weekly Top 5

Dhurandhar 2: रणवीरच्या 'धुरंधर २'ची परदेशातही क्रेझ, रिलीजआधीच ॲडव्हान्स बुकिंगमध्ये तब्बल २ लाख तिकिटे विकली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 17:39 IST

ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर काहीच तासांत 'धुरंधर २'च्या अॅडव्हान्स तिकीट बुकिंगला सुरुवात झाली होती. अवघ्या काही तासांतच 'धुरंधर २'ची लाखो तिकिटे विकली गेली आहेत. केवळ भारतातच नाही तर परदेशातही 'धुरंधर २'ची प्रचंड क्रेझ असल्याचं दिसत आहे. 

Dhurandhar 2: रणवीर सिंगच्या 'धुरंधर २' या सिनेमाचा ट्रेलर ७ मार्चला प्रदर्शित करण्यात आला. हा ट्रेलर पाहून चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे. ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर काहीच तासांत 'धुरंधर २'च्या अॅडव्हान्स तिकीट बुकिंगला सुरुवात झाली होती. अवघ्या काही तासांतच 'धुरंधर २'ची लाखो तिकिटे विकली गेली आहेत. केवळ भारतातच नाही तर परदेशातही 'धुरंधर २'ची प्रचंड क्रेझ असल्याचं दिसत आहे. 

'धुरंधर २'चे काही पेड प्रिव्ह्यू शो टीमकडून आयोजित करण्यात आले आहेत. सिनेमा १९ मार्चला रिलीज होणार आहे. मात्र हे पेड प्रिव्ह्यू शोचे स्क्रिनिंग १८ मार्चपासून संध्याकाळी ५ वाजता सिनेमागृहात दाखवले जाणार आहेत. यासाठी हे अॅडव्हान्स बुकिंग सुरू आहे. हे पेड प्रीव्ह्यू शो परदेशातही होणार आहेत. आत्तापर्यंत २ लाख तिकिटे विकली गेली असून कोटींची कमाई झाली आहे. तर अमेरिकेत सिनेमा रिलीज होण्याआधीच आठ दिवसांपर्यंतचे शो हे हाऊसफूल झाल्याचं कळतंय. त्यातून सिनेमाने १३.३९ कोटींची कमाई केली आहे. 

पेड प्रिव्ह्यू शो म्हणजे काय? 

सिनेमांची चर्चा होण्यासाठी आणि क्रेझ निर्माण करण्यासाठी काही सिनेमे हे रिलीजच्या एक दिवस आधीच रिलीज केले जातात. यामुळे चाहत्यांना सिनेमा रिलीज व्हायच्या अगोदरच तो पाहता येतो. यासाठी अॅडव्हान्स बुकिंगमधून चाहत्यांना तिकीट काढता येतं. आतादेखील 'धुरंधर २'च्या पेड प्रिव्ह्यू शोसाठी अॅडव्हान्स बुकिंग सुरू आहे. 'धुरंधर २'च्या एका तिकिटाची किंमत सुमारे ४००-६०० रुपयांच्या घरात आहे. 

आदित्य धरने 'धुरंधर २'चं दिग्दर्शन केलं आहे. या सिनेमात रणवीर सिंग, आर माधवन, सारा अर्जुन, अर्जुन रामपाल, संजय दत्त, दानिश पंडोर, राकेश बेदी हे कलाकार दिसणार आहेत. येत्या १९ मार्चला हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित केला जाणार आहे.  

English
हिंदी सारांश
Web Title : Ranveer's 'Dhurandhar 2' craze abroad; 2 lakh tickets sold!

Web Summary : Ranveer Singh's 'Dhurandhar 2' sees massive advance booking success, selling two lakh tickets before release. High demand is noted in India and overseas, especially in America. Paid previews are scheduled before the official March 19 release, generating significant revenue already.
टॅग्स :धुरंधर सिनेमारणवीर सिंग