Join us

​धोनी, सरबजित करणार आॅस्करवारी; कोण मारणार बाजी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2016 20:10 IST

आॅस्कर या नावाने ओळखला जाणारा अ‍ॅकॅडमी अवॉर्डस् एकदा तरी आपल्या चित्रपटाला मिळावा अशी मनोरंजनाच्या दुनियेत वावरणाºया प्रत्येकाचीच असते. आॅस्कर ...

आॅस्कर या नावाने ओळखला जाणारा अ‍ॅकॅडमी अवॉर्डस् एकदा तरी आपल्या चित्रपटाला मिळावा अशी मनोरंजनाच्या दुनियेत वावरणाºया प्रत्येकाचीच असते. आॅस्कर अ‍ॅवॉर्ड जरी हॉलिवूड चित्रपटांसाठी असला तरी देखील विविध देशातील ‘बेस्ट पिक्चर’ या नामांकनासाठी भारतातर्फे यंदा पाठविण्यात आलेल्या चित्रपटांत बायोपिक मानल्या जाणाºया चित्रपटांनी बाजी मारली आहे. आपल्या चित्रपटाने ‘आॅस्कर’वारी करावी यासाठी बॉलिवूडमध्ये चांगलीच चढाओढ लागली असते. आतापर्यंत केवळ बोटावर मोजता येतील एवढ्या चित्रपटांना आॅस्कर मिळविता आला असला तरी याचे आकर्षण आजही कायम आहे. अ‍ॅकॅडमी अवॉर्डस्च्या नामांकनासाठी ‘एम एस धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ व ‘सरबजित’ या दोन चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही चित्रपट बायोपिक आहेत. ‘एम.एस.धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ व ‘सरबजित’ हे दोन चित्रपट विविध देशातील चित्रपटांशी ‘बेस्ट पिक्चर’ या कॅटेगरीत जगभरातील चित्रपटांशी स्पर्धा करणार आहेत. या नामांकनासाठी आतापर्यंत जगभरातील ३३६ चित्रपटांची निवड झाली आहे. नीरज पांडे दिग्दर्शित ‘एम.एस.धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ चित्रपटात सुशांत सिंग राजपूत, दिशा पटणी, कायरा अडवाणी यांच्या मुख्य भूमिका होत्या. हा चित्रपट भारतीय क्रिकेट संघाचा कप्तान महेंद्र सिंग धोनी याच्या जीवनावर आधारित आहे. ‘सरबजित’ या चित्रपटात रणदीप हुडा, ऐश्वर्या राय-बच्चन व रिचा चढ्ढा यांनी मुख्य भूमिका केल्या होत्या. हा चित्रपट पाकिस्तानी कैदेत असलेला भारतीय शेतकरी सरबजीत याच्या जीवनावर आधारित आहे.  १ जानेवारी ते ३१ डिसेंबर या कालावधीत प्रदर्शित झालेल्या चित्रपटांची बेस्ट पिक्चर या श्रेणीत निवड करण्यासाठी एक ज्युरी या चित्रपटांना पाहणार आहे. या यादीत मीरा नायर दिग्दर्शित ‘क्वीन आॅफ कातवे’ या चित्रपटाचा समावेशही करण्यात आला आहे. या निवडी दरम्यान भारतीय बायोपिक्सना ‘कॅप्टन अमेरिका : सिव्हिल वॉर‘, ‘एक्स मेन : अ‍ॅपॉकॅलिप्स’ यासारख्या गाजलेल्या चित्रपटांशी स्पर्धा करावी लागणार आहे.