Join us

धर्मेंद्र यांचा हा व्हिडिओ होतोय सोशल मीडियावर व्हायरल, या व्यक्तीला त्यांनी म्हटले हिरो

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2020 19:01 IST

धर्मेंद्र यांनी त्यांच्या शेतातला एक व्हिडिओ नुकताच पोस्ट केला असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

ठळक मुद्देया व्हिडिओतील माणसाला धर्मेंद्र यांनी हिरो म्हटले आहे. या व्हिडिओसोबत त्यांनी कॅप्शन देखील लिहिली आहे. त्यांनी लिहिले आहे की, आ लौट के आजा मेरे मीत तुझे तेरे खेत बुलाते है... तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून खूप सारे प्रेम...

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र सध्या आपल्या फार्म हाऊसवर असून ते अभिनय कारकिर्दीत व्यग्र असल्याने करू न शकलेले काम सध्या करत आहेत. ते नेहमी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्यांच्या फार्म हाऊसवरील व्हिडिओ शेअर करत असतात. त्या व्हिडिओत ते शेती करताना दिसतात तर कधी दुसरी काही कामं करताना दिसतात. त्यांच्या या व्हिडिओला चाहत्यांची नेहमीच खूप पसंती मिळते. त्यांनी त्यांच्या शेतातला एक व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर पोस्ट केला असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

धर्मेंद्र यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओत एक माणूस शेतात काम करत असताना आपल्याला पाहायला दिसत आहे. या व्हिडिओतील माणसाला धर्मेंद्र यांनी हिरो म्हटले आहे. या व्हिडिओसोबत त्यांनी कॅप्शन देखील लिहिली आहे. त्यांनी लिहिले आहे की, आ लौट के आजा मेरे मीत तुझे तेरे खेत बुलाते है... तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून खूप सारे प्रेम...

धर्मेंद्र यांचा या व्हिडिओमधील देसी अंदाज त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. धर्मेंद्र यांनी ज्या माणसाचा हिरो म्हणून उल्लेख केला, तो कोबीची शेती करत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ धर्मेंद्र यांनी शेअर करून केवळ एक दिवस झाला असली तरी हा व्हिडिओ 80 हजाराहून अधिक लोकांनी पाहिला आहे. केवळ सामान्य लोकच नव्हे तर बॉलिवूडमधील सेलिब्रेटी देखील या व्हिडिओवर कमेंट करताना दिसत आहेत. 

धर्मेंद्र यांना प्रचंड फॅन फॉलोव्हिंग असून ते सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच त्यांच्या चाहत्यांच्या संपर्कात असतात. ते सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. 

टॅग्स :धमेंद्र