Join us
Daily Top 2Weekly Top 5

धर्मेंद्र, हेमामालिनी यांना चादर गुंडाळलेल्या अवस्थेत पकडले तेव्हा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2017 19:26 IST

७०च्या दशकातील गोष्ट आहे. एक असा बोल्ड फोटो व्हायरल झाला होता, ज्यामुळे बॉलिवूडमध्ये त्याकाळी कित्येक महिने एकच हंगामा झाला ...

७०च्या दशकातील गोष्ट आहे. एक असा बोल्ड फोटो व्हायरल झाला होता, ज्यामुळे बॉलिवूडमध्ये त्याकाळी कित्येक महिने एकच हंगामा झाला होता. आजचे बॉलिवूड मॉर्डन बॉलिवूड आहे. त्यामुळे एखाद्या स्टार्सचा न्यूड फोटो व्हायरल झाल्यास फारसे गंभीर समजले जात नाही. गेल्या काही दिवसांपासून तर न्यूड फोटो व्हायरल होण्याचे प्रमाण वाढलेच आहे. परंतु जरा विचार करा की, ७०च्या दशकातील बॉलिवूडची स्थिती काय असेल?त्याकाळी कलाकार त्यांच्या कपड्यांपासून तर डायलॉग काय बोलायचे याचे भान ठेवत असत. आता तुम्ही म्हणाल की, ७०च्या दशकातील बॉलिवूडची माहिती आज सांगण्याची काय गरज? पण याच दशकातील अतिशय हॉट समजल्या जाणाºया एका कपलचा असाच काहीसा फोटो जोरदार व्हायरल होत आहे. जेव्हा हा फोटो समोर आला होता तेव्हा या दोन्ही कलाकारांच्या आयुष्यात जणू काही वादळ निर्माण झाले होते. जेव्हा हे दोघे विवाहाच्या बंधनात अडकले तेव्हाच हे वादळ शांत झाले होते. होय, आम्ही इंडस्ट्रीमधील त्या जोडप्याविषयी बोलत आहोत, ज्यांनी प्रेमाचा आदर्श निर्माण केला आहे. ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र आणि ड्रीम गर्ल हेमामालिनी यांचा तो किस्सा आहे. त्यांचा ७०च्या दशकातील एक चादर गुंडाळलेला फोटो सध्या व्हायरल होत आहे. हा फोटो तेव्हा काढला गेला जेव्हा ‘शोले’ या चित्रपटाची शूटिंग सुरू होती. शूटिंगमधून जेव्हा या दोघांना थोडासा निवांत वेळ मिळाला होता, तेव्हा हे दोघे अशा स्थितीत बघावयास मिळाले होते. फोटोमध्ये धर्मेंद्र आणि हेमामालिनी यांना चेन्नईच्या एका दिग्दर्शकाने हॉटेलमध्ये अशा स्थितीत पकडले होते. दोघांनीही चादर गुंडाळून कॅमेºयाला पोज दिली होती. हा फोटो जेव्हा माध्यमांसमोर आला तेव्हाच या दोघांमधील प्रेमप्रकरणाची चर्चा समोर आली होती. दोघांमध्ये मैत्री पलीकडचे नाते निर्माण झाले होते. जेव्हा या दोघांनी लग्नाचा विचार केला होता, तेव्हा धर्मेंद्र यांना बºयाचशा अडचणींचा सामना करावा लागला. कारण धर्मेंद्र्र अगोदरच विवाहित होते. शिवाय त्यांना दोन मुलेही होते. धर्मांतर करून त्यांना हेमा यांच्याशी विवाह करावा लागला होता. त्याकाळात हेमामालिनी यांना ‘ड्रीम गर्ल’ म्हणून ओळखले जात होते. त्यांच्याशी विवाह करण्यासाठी बॉलिवूडमधील अनेक दिग्गज उत्सुक होते. ‘शोले’च्या शूटिंगदरम्यान तर अभिनेता संजीवकुमार यांनी त्यांना लग्नासाठी मागणीही घातली होती. जितेंद्र यांनीदेखील हेमाला लग्नासाठी मागणी घातली होती. मात्र हेमा यांनी धर्मेंद्र यांच्याशी विवाह केला.