Join us

अशी सुरु झाली होती धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची लव्हस्टोरी, दोघांमध्ये आहे १३ वर्षांचे अंतर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2020 17:47 IST

त्रपटांमध्ये काम करत असतानाच धर्मेंद्र आणि हेमा मालिनी एकमेकांच्या प्रेमात पडले.

हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांचे कपल त्यांच्या चाहत्यांना चांगलेच आवडते. आज धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या लग्नाचा  वाढदिवस आहे. या जोडीने आजवर एकाहून एक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. त्यांनी सुरुवातीला शराफत आणि तुम हसीन मैं जवाँ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. त्यांची या चित्रपटातील जोडी प्रेक्षकांना भावल्यानंतर त्यांना अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम करण्याची संधी मिळाली.

चित्रपटांमध्ये काम करत असतानाच धर्मेंद्र आणि हेमा मालिनी एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी पुढे जाऊन लग्न केले. हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्यात 13 वर्षांचे अंतर असून धर्मेंद्र यांनी लग्न करण्याच्या आधी इस्लाम धर्म स्वीकारला होता. 

हेमा मालिनी यांच्यासोबत लग्न व्हायच्याआधी धर्मेंद्र यांचे प्रकाश कौर यांच्यासोबत लग्न झाले होते. धर्मेंद्र यांना काही केल्या त्यांच्या पहिल्या पत्नीला घटस्फोट द्यायचा नव्हता. हेमा मालिनीसोबत लग्न केल्यानंतरही धर्मेंद्र आपल्यी पहिल्या पत्नीला सोडणार नसल्याचे त्यांनी लग्नाच्या आधीच हेमा मालिनी यांना सांगितले होते. हिंदू धर्मात दोन लग्न करण्याची परवानगी नसल्याने धर्मेंद्र यांनी इस्लाम धर्म स्वीकारून त्यांचे नाव दिलवार ठेवले आणि हेमा मालिनी यांच्यासोबत लग्न केले.

टॅग्स :धमेंद्रहेमा मालिनी