Join us

नातवाच्या लग्नासाठी सजला धर्मेंद्र यांचा बंगला, जाणून घ्या कोण आहे देओल कुटुंबाची होणारी सून?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2023 15:51 IST

करण आणि द्रिशाच्या लग्नात संपूर्ण देओल कुटुंब सहभागी झाल्याची चर्चा आहे.

धर्मेंद्र यांचा नातू करण देओल त्याची दीर्घकाळाची मैत्रीण आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते बिमल रॉय यांची नात द्रिशा आचार्यसोबत लग्नगाठ बांधणार आहे. नातवाच्या लग्नासाठी धर्मेंद्र यांचा बंगला फुलांनी आणि लाईट्सनी सजवला आहे, संपूर्ण कुटुंब लग्नाच्या तयारीत व्यस्त आहे.  16 जूनपासून करण आणि द्रिशा च्या लग्नाचे विधी सुरू होणार आहेत. 

मीडिया रिपोर्टनुसार, हे लग्न 16, 17, 18 जून असे तीन दिवस चालणार असल्याचे बोलले जात आहे. रिसेप्शन 18 जून रोजी वांद्रे येथील ताज लँड्स एंड येथे आहे. करण द्रिशाचे 18 जून रोजी मुंबईत पोस्ट-वेडिंग रिसेप्शन होणार आहे. निमंत्रणपत्रिका छापण्यात आली असून बॉलिवूड आणि साऊथ इंडस्ट्रीतील जवळपास सर्वांनाच आमंत्रणं पाठवण्यात आली आहेत. संपूर्ण देओल कुटुंब करण आणि द्रिशाच्या लग्नात सहभागी झाल्याची बातमी आहे

द्रिशा आणि करण गेल्या 6 वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. द्रिशा ट्रॅव्हल इंडस्ट्रीशी निगडीत आहे आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते बिमल रॉय यांची नात आहे. साखरपुड्यानंतर दोघे एकत्र मुंबईत स्पॉट झाले होते. यादरम्यान दोघांनी पापाराझींनी पोजही दिल्या होत्या. 

करण देओल हा सनी देओल आणि पूजा देओल यांचा मुलगा आहे. त्याच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर तो यमला पगला दीवाना 2, पल पल दिल के पास यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसला आहे. बॉलिवूडमध्ये तो अद्याप एकही हिट चित्रपट देऊ शकला नाही. 

टॅग्स :धमेंद्रसनी देओल