धर्मेंद्र यांनी पहिल्या पत्नीसोबत साजरे केले न्यू इअर; बऱ्याच वर्षांनंतर पहिल्या पत्नीचा फोटो आला समोर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2018 20:59 IST
आपल्या दमदार अभिनय आणि डॅशिंग अंदाजासाठी ओळखले जाणारे अभिनेते धर्मेंद्र यांनी नव्या वर्षाचे स्वागत आपल्या परिवारासमवेत केले. त्यांनी त्यांची ...
धर्मेंद्र यांनी पहिल्या पत्नीसोबत साजरे केले न्यू इअर; बऱ्याच वर्षांनंतर पहिल्या पत्नीचा फोटो आला समोर!
आपल्या दमदार अभिनय आणि डॅशिंग अंदाजासाठी ओळखले जाणारे अभिनेते धर्मेंद्र यांनी नव्या वर्षाचे स्वागत आपल्या परिवारासमवेत केले. त्यांनी त्यांची पहिली पत्नी प्रकाश कौर आणि दोन्ही मुले सनी आणि बॉबी देओलसोबत नवीन वर्ष साजरे केले. गेल्या कित्येक वर्षांनंतर त्यांच्या पहिल्या पत्नीचा फोटो समोर आला आहे. बॉबी देओलने नव्या वर्षाचे सेलिब्रेशन करतानाचा एक फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये धर्मेंद्र, प्रकाश कौर, सनी देओल आणि बॉबी देओल दिसत आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये बॉबीने लिहिले की, ‘Happy new year. Love love love to all’ धर्मेंद्र यांची पहिली पत्नी प्रकाश कौर या सुरुवातीपासूनच लाइमलाइटपासून दूर आहेत. त्यामुळेच त्यांना आजपर्यंत कुठल्याही पार्टी अथवा इव्हेंटमध्ये बघता आले नाही. त्यामुळेच त्या अखेरीस केव्हा बघावयास मिळाल्या? असे जर कोणाला विचारले तर कदाचित त्याचे उत्तर कोणीही देऊ शकणार नाही. दरम्यान, ८२ वर्षीय धर्मेंद्र यांनी पत्नी प्रकाश कौर यांना घटस्फोट न देताच ड्रिम गर्ल हेमा मालिनी यांच्यासोबत लग्न केले. धर्मेंद्र आणि प्रकाश कौर यांचा विवाह १९५४ मध्ये झाला होता. त्यावेळी धर्मेंद्र यांचे वय केवळ १९ वर्ष इतके होते. या दोघांना चार मुले आहेत. सनी-बॉबी व्यतिरिक्त अजेता आणि विजेता या दोन मुली आहेत. चित्रपटात एकत्र काम करीत असताना धर्मेंद्र यांचे हेमाबरोबर अफेअर झाले. पुढे दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र प्रकाश कौर धर्मेंद्र यांना घटस्फोट देण्यास तयार नव्हत्या. त्यामुळे दोघांनी इस्लाम धर्म स्वीकारून लग्न केले. या दोघांना ईशा आणि आहना अशा दोन मुली आहेत. धर्मेंद्र आणि हेमामालिनी यांनी जवळपास ३० चित्रपटांमध्ये काम केले.