Join us
Daily Top 2Weekly Top 5

धनुषला चेन्नई उच्च न्यायालयाने ‘या’ कारणासाठी हजर राहण्याचे दिले आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2017 19:36 IST

‘कोलावरी’ गाण्याच्या तालावर अनेकांना थिरकवणारा सुपरस्टार रजनीकांतचा जावाई आणि ‘रांझणा’ फेम अभिनेता धनुष सध्या वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. गेल्या ...

‘कोलावरी’ गाण्याच्या तालावर अनेकांना थिरकवणारा सुपरस्टार रजनीकांतचा जावाई आणि ‘रांझणा’ फेम अभिनेता धनुष सध्या वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी एका वृद्ध दाम्पत्याने धनुष त्यांचा मुलगा असल्याचा दावा केला होता. मात्र धनुषने या प्रकरणाकडे फारशे गांभीर्याने न घेता, त्याला फाटा देण्याचा सुरुवातीला प्रयत्न केला होता. परंतु आता हे प्रकरण गंभीर झाले असून, यासाठी त्याला २८ फेब्रुवारी रोजी चेन्नई उच्च न्यायालयात हजर रहावे लागणार आहे.  न्यायाधीश जी. चोकालिंगम यांच्या पीठाने धनुषचे पिता असल्याचा दावा करणाºया कातिरेसन यांनी केलेल्या याचिकेवर हे निर्देश दिले आहेत. यावेळी न्यायालयाने धनुषला ओळखपत्राचे सत्यप्रत सादर करण्याचे आदेश दिले आहेत. कातिरेसन यांनी त्यांच्या याचिकेत म्हटले होते की, धनुष माझा मुलगा असल्याचे सर्व पुरावे नष्ट करण्याची शक्यता आहे. त्यामुळे याविषयी तातडीने निर्णय देणे अपेक्षित आहे. याच दांम्पत्याने धनुष हा आपलाच मुलगा असल्याचा दावा केला आहे.यावेळी त्यांनी याचिकेत असेही म्हटले होते की, धनुषने सादर केलेला जन्म दाखला सत्य नाही. कारण त्यात त्याच्या मूळ नावाचा व जन्मतारखेचा उल्लेख केलेला नाही. धनुषने गेल्या महिन्यातच न्यायालयाकडे ही याचिका रद्द करण्याची मागणी केली होती, तर कातिरेसन आणि मीनाक्षी यांनी ६५ हजार मासिक भत्ता दिला जावा, अशी मागणी केली होती. आता यावर न्यायालयाकडून नेमका कुठला निर्णय दिला जातो हे बघणे औत्सुक्याचे ठरेल. दरम्यान, या दाम्पत्याने धनुषचे काही लहानपणीचे फोटो आणि जन्मतारखेचा दाखला दाखवत, धनुष हा आपलाच मुलगा असल्याचा दावा केला होता. धनुष हा अभ्यासात कच्चा होता. त्यामुळे २००२ साली तो पळून गेला. यानंतर तो ‘धनुष’ नावाने चित्रपटात काम करू लागला. त्याचे नाव ‘कलाईसेल्वम’ आहे. त्याने मेलूरमध्ये आर. सी. हायर सेकंडरी स्कूल व गव्हर्नमेंट बॉइज हायर सेकंडरी स्कूलमध्ये दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले होते. अभिनेता झाल्यानंतर धनुष कधीही आम्हाला भेटायला आला नाही. आम्ही एकदा स्वत: चेन्नईत भेटायला गेलो. पण आम्हाला त्याला भेटू देण्याऐवजी हाकलून लावण्यात आले होते, असा दावा या दाम्पत्याने केला होता. मात्र धनुषने हा दावा फेटाळून लावत मला ब्लॅकमेल करण्यासाठी या दाम्पत्याकडून एवढा खटाटोप केला जात असल्याचे म्हटले होते. त्यामुळे हे प्रकरण न्यायालयात पोहचले आहे. ALSO READ : ​- धनुष म्हणतो, ‘ते’ मला ब्लॅकमेल करत आहेत!- ​वृद्ध दांम्पत्याने केला दावा; म्हणे धनुष आमचा पळून गेलेला मुलगा!